Pune: अनेक वर्षांनंतर रात्रीच्या वेळी हडपसरच्या मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आमदार चेतन तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खासगी बसेसची होणारी पार्किंग आणि खासगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबे आता शेवाळेवाडी (मांजरी बुद्रुक) येथे पीएमपीएमएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. याबाबत नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. आमदार चेतन तुपे यांनी  रविवारी(दि. ९) रोजी स्वतः … Read more

Pune Crime: म्हातारा संगतीला आणि कटर कमरेला…; दोघा मैत्रिणींनी तयार केली ‘बांगडी कटर’ टोळी; 7 गुन्हे उघडकीस

पुणे  – पीएमपी बसमध्ये गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील बांगड्या कटरने कापून चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या. एक-दोन टोळ्या हाती लागल्या तरी चोऱ्या कमी होत नसल्याने गुन्हे शाखेने कसून शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दोन मैत्रिणींनी तयार केलेली टोळी हाती लागली. या दोघींनी एका वयोवृद्ध नागरिकाच्या मदतीने वर्षभरात शहरात धुमाकूळ घातला होता, त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले. … Read more

PUNE: येरवडा मेट्रो स्थानकांवरून विमानतळासाठी फिडर सेवा

पुणे – मेट्रो प्रकल्पातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, त्या सोबतच या स्थानकाच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पादाचार्‍यांसह, विमानतळ तसेच नगररस्त्याने जाणार्‍या खासगी तसेच एसटीच्या बसेससाठी स्वतंत्र बस बे उभारले … Read more

पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती; PMPML बस चालकाने वाहनांना उडवले

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. एका PMPML बस चालकाने 10 ते 15 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे. या PMPML बस चालकाच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश सावंत असे या चालकाचे नाव आहे.  या … Read more

पुणे जिल्हा | पाबळला ‘पीएमपीएमएल’ बसचे उत्स्फूर्त स्वागत

पाबळ – पाबळ ते पुणे मनपा अशी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून बस सेवा शनिवारी (दि. 29) रोजी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जातेगाव बुद्रुक, धामारी, मुखई आणि पाबळ येथे आलेल्या दोन बसेसचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

दरम्यान पाबळ येथे या बसेसचे स्वागत करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. यावेळी बसेसचे वाद्यां च्या गजरात व फटाके फोडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी पूजा करून पेढे वाटले तर बसचालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. स्वागतासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती व सर्वांनी केलेले स्वागत यामुळे उपस्थितांनी आनंद व्यक्‍त केला.

यावेळी प्रमुख नेते भगवान शेळके, प्रकाश पवार, सुरेश पलांडे, सुभाष उमाप, दत्तोबा भगत, पाबळचे सरपंच मारुती शेळके यांसह पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय सचिव नुरुद्दीन इनामदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणेकरांना दिलासा! पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीटदरवाढही रद्द; असे असतील नवे दर

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ७ सप्टेंबरपासून केली जात आहे. तर दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पासेसचे दर कमी करण्यासंदर्भात आणि दरवाढ टाळण्यासाठी महापौर मोहोळ … Read more

महत्वाचे : पुण्यात पीएमपीकडून 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक बससेवा पुरवण्यात येत आहे. याशिवाय ‘पुष्पक’ या शववाहिनीची सेवा सुरू आहे. या सेवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संपर्क साधता येण्यासाठी पीएमपीकडून वायरलेस हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 9921960911 या क्रमांकाची सेवा 24 तास सुरू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्याने शहरातील पीएमपी प्रवासी वाहतूक … Read more

मोठी बातमी: पुण्यात अंशत: लॉकडाऊन; 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

पुणे :  पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट  होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.  पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस … Read more

पीएमपीत पुन्हा 50% प्रवासी

पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा 50 टक्‍के क्षमतेने धावणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत. शहरातील करोनाबाधित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या बसेसचे 50 टक्‍के क्षमतेने संचलन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लॉकडाऊननंतर सप्टेंबरपासून पीएमपीची सेवा पूर्ववत झाली. त्यावेळीदेखील प्रशासनाने 50 टक्‍के … Read more

नांदुर ग्रामस्थांकडून PMPML बसचे ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत

नांदुर (ता. दौंड) – स्वारगेट उरूळी कांचन मार्ग नांदुर पीएमपीएमएल चे सहजपुर नांदुर येथिल ग्रामस्थांच्यावतीने उस्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात आले. नांदूर गावांमध्ये पीएमपीएल बस आल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम-ताशा च्या गजरामध्ये स्वागत केले. बस सेवेचा प्रारंभ पीएमपीएल चे संचालक शंकरराव पवार नांदूर चे सरपंच लता थोरात उपसरपंच रविंद् बोराटे आदी मान्यवर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. … Read more