पुणे | माण -हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची लवकरच ट्रायल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “पीएमआरडीए’च्या माण -हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. यासाठी आंध्रप्रदेश येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन रविवारी माण येथील डेपोत दाखल झाली. लवकरच तिची ट्रायल घेतली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतला असून, त्याच्या … Read more

पुणे | चेन्नईहून डबे येताच हिंजवडी मेट्रोची चाचणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या इलिव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. या साठी चेन्नई येथे तयार करण्यात आलेले तीन डबे जूनमध्ये पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर त्याची चाचणी घेतली जाणार आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वर्षातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय … Read more

पुणे | पीएमआरडीए हद्दीतही मृत्यूचे सापळे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत सुमारे दीड हजारांपेक्षा अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. पण, त्यावर आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करते. पण, होर्डिंगमालकांनी याला दाद दिलेली नाही. आता या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे धाडस “पीएमआरडीए’ दाखविणार … Read more

पुणे जिल्हा | हिंदुत्त्वासाठी मनसे मोदींच्या पाठीशी

आळंदी – मोदींचे बळकट सरकार येण्यासाठी राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. विकास, प्रगती साधताना हिंदुत्वदेखील बळकट राखण्यासाठी आम्ही मनसैनिकांनी हडपसर, शिरूर भागात बैठका घेतल्या आहेत. मोदींसाठी आढळराव यांच्यासोबत प्रत्येक मनसैनिक राहील अशी ग्वाही मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर यांनी आळंदी येथे दिली. मरकळ-आळंदी मतदारभेट दौर्‍यात आळंदीत झालेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. … Read more

Pune: निवडणुक रोखे प्रकरणातील कंपन्यांनी भरले रिंग रोडचे टेंडर

पुणे – निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बाॅंड प्रकरणात राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी दिल्यामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नवयुग इंजिनिअरिंग कंपनी यांनी पुणे जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पासाठी निविदा भरल्या आहेत. त्यामुळे आता पुणे रिंगरोडचे काम कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास … Read more

पुणे | धरणे उशाला, तरी कोरड घशाला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराच्या उशाला तब्बल ३० टीएमसी पाण्याची क्षमता असलेली चार धरणे आहेत. तरीही, पुण्यातील जवळपास २० टक्के लोकसंख्येला पाण्यासाठी टॅंकरचा आसरा घ्यावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने सुमारे ४ लाख ३४८ टॅंकर फेऱ्या उपनगरे आणि समाविष्ट गावांना पाणी पुरविले आहे. एका टॅंकरसाठी २ हजारांचा खर्च गृहीत धरला, तर या टॅक़र फेऱ्यांवर तब्बल … Read more

Pune: पीएमपीला आर्थिक वर्ष लाभाचे

पुणे – पीएमपी प्रशासनाकडून जास्तीत जास्त बस मार्गावर आणल्या जात आहेत. तसेच, ताफ्यात ई-बस आल्यामुळे मागील वर्षभरात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएमपीला तिकिट विक्रीतून जवळपास ७८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे प्राशासनाकडून सांगण्यात आले. पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण १ हजार ७०० बसच्या माध्यमातून प्रवाशांना … Read more

Pune : अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करू

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, तसेच जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी येत्या 31 मार्चपर्यंत त्यास परवानगी घ्यावी, किंवा काढून टाकावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. 31 मार्चनंतर प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा पीएमआरडीएने … Read more

पुणे | गुंठेवारी दर निश्चिती रखडली

पुणे, {गणेश आंग्रे} – गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला. मात्र, या दरास प्राधिकरण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा, पक्षप्रवेश, जागा वाटप, प्रचार सभा यामध्ये सत्ताधारी गुरफुटले असल्याने प्राधिकरणाच्या समितीची बैठक लांबणीवर पडली … Read more

पुणे | वाहतूक कोंडीचा पीएमपीलाही वैताग

कोंडीचे वेळापत्रक ! * सकाळी 8 ते 11 * सायंकाळी 5 ते 8 पुणे, {सागर येवले} – शहरातील वाहतूक कोंडीचा फटका पीएमपी बससेवेला बसत असून, दररोज कोंडीमुळे लांब मार्गावरील सर्व बस पंधरा मिनिटे ते एक तासापर्यंत उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. असा परिस्थितीत पीएमपीलाच फीडर सेवेची आवश्यकता असून, या सेवेमुळे प्रवाशांचा … Read more