Pune: कामगारांना बांधून ठेवून २० लाखांचे मोबाईल पळविले

पुणे – टिळक रोडवरील एका मोबाईलच्या स्टोअररूमधील कामगारांना चाकूच्या धाकाने बांधून ठेवत दुकानातील २० लाख ५० हजारांचे मोबाईल चोरून पळालेल्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यातील दोघेजण मुंबईतील असून एकजण चिंचवडमधील आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. झबीउल्लाह नबीउल्लाह खान (२८, रा. घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (२०, रा. मुंबई), कमलेश विश्वास मोरे … Read more

डेन्मार्कच्या पंतप्रधानांना धक्काबुक्कीचा प्रयत्न; हल्लेखोराला पोलिसांनी केली अटक

Mette Frederiksen – डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडेरिकसन यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न काल एका व्यक्तीने केला. कोपनहेगन शहराच्या मध्यभागात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या हल्ल्याबद्दल अधिकाऱ्यांनी अधिक तपशील दिलेला नाही आणि फ्रेडरिकसन यांना काही दुखापत झाली की नाही हे स्पष्ट झाले … Read more

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान

मुंबई – राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके … Read more

मुंबईत पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on police in Mumbai – येथील पवई येथे भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे. … Read more

कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरण: अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ताब्यात

पुणे  – पुण्यातील कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या आईला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या दोन जणांना धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात अल्पवयीन चालकाचे वडील विशाल … Read more

“माझ्या आयुष्याची काहीच किंमत नाही…” ; पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या तरुणावर कारवाई, आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Pune Porsche Crash ।

Pune Porsche Crash । पुण्यात पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या चेहऱ्याशी … Read more

Pune: हडपसर परिसरात टोळक्याने दहा वाहनांची केली तोडफोड

पुणे – हडपसर भागातील काळेपडळ परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य सूर्यवंशी, आदित्य मोहोळकर यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल बाळासाहेब लोंढे (वय १९, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) याने याबाबत हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद होता. अमोल आणि त्याचा … Read more

Pune: पालिकेच्या मागणीला केराची टोपली

पुणे – कल्याणीनगर, वडगावशेरी, घोरपडी, तसेच कोरेगाव पार्क परिसरासह शहराच्या उपनगरांमध्ये रूफ टॉप हॉटेल, रेस्टॉरंट, पब येथे दारूविक्रीचा परवाना देण्यापूर्वी त्या जागेवर महापालिकेची परवानगी देऊन बांधकाम केले आहे की नाही, याबाबत महापालिकेची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेतले जावे, अशी मागणी महापालिकेने जानेवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र, महापालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. … Read more

Pune: कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

पुणे:  राज्यसह देशभरात गाजलेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास अखेर सहा दिवसानंतर पुणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. रविवारी (दि १९ ) झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने मोटार चालून दोघा अभियंताचा जीव घेतला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. मात्र अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेपमुळे … Read more

फोनवर पत्नीशी भांडण झालं अन् मनोरुग्ण थेट रेल्वेच्या छतावरच चढला; पुढं काय घडलं? वाचा…

पुणे : पत्नीसोबत फोनवर भांडण झाल्याने मनोरुग रेल्वे थेट रेल्वेच्या छतावर चढला. मात्र रेल्वे पोलिसांनी यशस्वीरित्या त्याला खाली उतरवले आहे. सदरचा व्यक्ती मूळचा बिहारचा असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संजय कुमार दरोगी शर्मा (वय 28) सदरील व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणाचा अधिकचा तपास पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी … Read more