पुणे | दोषी अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा वरदहस्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या,’ असे म्हणत “पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसयिकांना धार्जिणे असून, त्यांची तातडीने बदली करा,’ अशी मागणी काँग्रसेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केली. “कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये घेतले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार … Read more

Pune News : …त्या मुलीचा शोध घेण्यास पोलीस आयुक्तांचा पुढाकार; वाघोलीला पोलीस छावणीचे स्वरूप

वाघोली (प्रतिनिधी) – नांदेड सिटी येथून आईवडील रागवल्याने बेपत्ता झालेली 12 वर्षाची मुलगी अखेर रांजणगाव येथे सुखरूप सापडली. नांदेड सिटी येथून ती दुपारी दोन वाजता आईवडील रागवल्याने ती घरातून निघुन गेली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः तिच्या शोधासाठी वाघोलीत रात्री सव्वा दहा वाजता दाखल झाले. यामुळे वाघोलीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. … Read more

कात्रज गोळीबार प्रकरण : तीन पोलीस ठाण्यांचे अधिकारी फैलावर, पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल

पुणे – कात्रजमधील संतोषनगर येथील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी भारती विद्यापीठ, सिंहगडरोड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना फौलावर घेतले. यापुढे जर हद्दीत असे प्रकार घडले तर सोडणार नाही असा दम देखील त्यांनी भरला. यावेळी, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, तिन्ही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तपासपथकांचे प्रमुख … Read more

पुणे | निखिल वागळे यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, माहिती-तंत्रज्ञान कायदा, दंगल घडविणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वागळे यांनी याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठविले आहे. पर्वती पायथा परिसरातील साने गुरुजी स्मारकाच्या आवारात ९ फेब्रुवारी रोजी निर्भय बनाे सभेचे आयोजन … Read more

सायलेंट झोनमधील कार्यक्रम रद्द करुन आयोजकांवर गुन्हे दाखल करा; पोलिस आयुक्तांकडे युवासेनेची मागणी

पुणे – बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायलेंट झोनमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा तसेच आयोजन आणि परवानगी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. येथे होणाऱ्या कॉन्सर्ट संदर्भात अगोदरही स्थानिक नागरिकांडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे शहर प्रमुख सनी गवते यांनी पोलीस … Read more

PUNE: पुणे सायबर पोलीस ठाण्याचे विभाजन; पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुणे – सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे दाखल करणे, तसेच तपासासाठी पोलीस ठाण्यातील कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने सायबर पोलीस ठाण्याच्या कामकाजात बदल करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सध्या … Read more

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्‍तांकडून ‘धडे’

चांगले नागरिक होऊन समाज, देशासाठी योगदान द्या : रितेश कुमार पुणे – “विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी आपापसात न भांडता, कोणी चुकीचे वागत असेल तर पोलीस व विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांकडे जावे. एक चांगले नागरिक होऊन देशासाठी, समाजासाठी चांगले योगदान द्या,’ अशा शब्दांत पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन … Read more

जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवानाने गोळीबार का केला ? पोलीस आयुक्त म्हणाले..

मुंबई – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. या धक्कादायक घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे देखील समोर आले होते. यानंतर या जवानाने नेमकं हा गोळीबार का केला ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता याबाबतची महत्वाची माहिती … Read more

पुणे: पोलीस आयुक्‍तांकडून कोथरूड पोलिसांचा सन्मान

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हव्या असलेल्या इम्रान खान आणि युनुस साकी या दोन्ही दहशतवाद्यांना मंगळवारी बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांच्याकडून कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी, अंमलदार प्रदीप चव्हाण, अमोल … Read more

Pune : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांचा पुढाकार; नागरिकांना व्हॉट्सअॅपवर सूचना पाठविण्याचे आवाहन

पुणे – शहरात सदाशिव पेठेत घडलेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 8975953100 हा व्हॉटस्‌ अप नंबर जाहीर केला असून त्यावर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत इतर घटनांचा आढावा घेऊन सूचनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच तातडीच्या सेवेसाठी 112 नंबरवर संपर्क करावा, … Read more