तालिबानबरोबरच्या संघर्षात 10 पोलीस ठार

काबुल – मध्य अफगाणिस्तानच्या उर्झगन प्रांतात तालिबान आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षामध्ये किमान 10 पोलीस ठार झाले. या संघर्षात तालिबानचे 15 दहशतवादीही ठार झाले. उर्झगन प्रांतात गेल्या चार दिवसांपासून सुरक्षा रक्षक आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे.  उर्झगन प्रांतातल्या गिझाब जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांवर सुमारे 100 तालिबानींनी हा हल्ला केला होता. तालिबान्यांनी जिल्ह्याच्या बहुतांश भागावर आपला … Read more

दोन पोलिसांची हत्या करणारे अटकेत

  पंचकुला – हरियाणातील बुटाना गावाजवळ गस्त घालत असलेल्या दोन पोलिसांची हत्या प्रकरणात फरारी असलेल्या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशी करण्यासाठी आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आरोपी विकास घुसकानी आणि नीरज पाथरी असे आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सांगितले की गस्त घालत असलेल्या पोलिसामनी त्यांना मुलींसोबत पकडले होते. यावरून मुख्य आरोपी … Read more

आठ पोलिसांचा मारेकरी विकास दुबे अजून फरारीच त्याला शोधण्यासाठी 25 पथके स्थापन

  लखनौ – उत्तरप्रदेशात काल गुंडांकडून आठ पोलिसांची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड विकास दुबे मात्र अजून फरारीच असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 25 पथके स्थापन केली आहेत. त्याच्या राज्यातील व राज्याबाहेरील सर्व ठिकाणांवर पोलीस छापे टाकले जात आहेत, अशी माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहीत आगरवाल यांनी दिली. पोलिसांनी … Read more

पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीलाही करोना संसर्ग

फरासखाना ठाण्यातील 20 ते 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे  – फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला करोना संसर्ग झाला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संर्पकात आलेल्या 20 ते 25 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा पोलीस कर्मचारी एका वरिष्ठ पोलीस … Read more

बारा हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसावर गुन्हा

सातारा – रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईक कणसे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून काल (दि. 13) रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणसेला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी, तक्रारदाराविरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more