ओबीसींचे राजकीय राजकीय आरक्षण टिकावे ही शासनाची प्रामाणिक भूमिका – विजय वडेट्टीवार

मुंबई :- मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जयंत बांटीया आयोग नेमण्यात आला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी मातब्बर वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरक्षण टिकण्यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. हा आयोग टिकेल असा विश्वास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत व्यक्त … Read more

पुणे : आधी राजकीय आरक्षण, निवडणूक होऊ दे नंतर…

बिबवेवाडी (हर्षद कटारिया) –विधानसभेत ओबीसी राजकीय आरक्षणाचे विधेयक सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. यामुळे निवडणुकीसंदर्भातील अधिकार राज्य सरकारकडे आले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याने यातून निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. तर, पहिले राजकीय आरक्षण.., निवडणूक होऊ दे नंतर.., अशी भावना सर्व राजकीय पक्षांतील ओबीसी नेते, पदाधिकारी यांच्याकडून … Read more

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकार आग्रही : आमदार चेतन तुपे

हडपसर (विवेकानंद काटमोरे) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही आहे. ओबीसी समाजाचे हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सर्व पातळ्यांवरती सरकार निश्‍चित करेल.असा आशावाद हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

OBC political reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्राच्या हालचाली, पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पाठोपाठ इतर राज्यांमधील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्याची भीती असल्याने ते टिकवण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न सुरु केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. केंद्र सरकार ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्‍यता … Read more

ओबीसींची वज्रमूठ! राजकीय आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर

लोणावळा (वार्ताहर) – ओबीसींचे आरक्षण आणि अन्य प्रलंबित न्याय हक्‍कासाठी लोणावळा शहरात घेण्यात आलेल्या दोनदिवसीय चिंतन आणि मंथन शिबिराचा समारोप रविवारी (दि. 27) झाला. यावेळी राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखरबावनकुळे, माणिकराव ठाकरे, अण्णा डांगे, संजय राठोड, माजी आमदार नारायण मुंडे या सर्वपक्षीय नेत्यांसह ओबीसी समाजाचे अनेक मान्यवर … Read more

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देणार; देवेंद्र फडणवीसांची प्रतिज्ञा

नागपूर – जर राज्यात सत्ता मिळाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठीचे राजकीय आरक्षण परत मिळवले जाईल. जर यामध्ये भाजपला अपयश आले तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ, असा इशारा भाजपचे नेते देवेंद्र फडणवास यांनी दिला आहे. “ओबीसीं”च्या राजकीय आरक्षणासाठीचा कोटा पुन्हा देण्यात यावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या “चक्का जाम’ आंदोलनाच्यावेळी ते बोलत होते. … Read more

“ओबीसी आरक्षण परत आणू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेतो”; चक्काजाम आंदोलनात देवेंद्र फडणवीस आक्रमक

नागपूर : राज्य सरकार आपल्या अपयशाचे खापर मोदींवर फोडत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाही तर राजकीय संन्यास घेतो असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिले आहे. 50 टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही … Read more

#OBC | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले – देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

…तर दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही; कायदा मंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – देशभरात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. त्यात आता दलित आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनुसूचित जातीतील व्यक्तींनी धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केल्यास, ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच असे लोक अनुसूचित जातीसाठी मिळणाऱ्या आरक्षणाचाही फायदा उठवू शकणार नाहीत, असं त्यांनी … Read more