दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत – अहवाल

दावोस – संपूर्ण जगात दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत जात आहेत. या दराने यावर्षी किमान 26.30 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची शक्यता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ या शीर्षकाच्या अहवालात हा दावा केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील दशकांच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले … Read more

गोरगरीबांची भूक भागविणारी ‘शिवभोजन थाळी’ झाली एक वर्षाची!

मुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख ‘अन्नपूर्णेची थाळी’ म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या  ( Shiv Bhojan Thali ) अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत 3 कोटी 5 लाख 39 हजार 644 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गरिबांची भूक भागविणारी योजना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत … Read more

खळबळजनक ! 15 कोटी जनतेवर गरिबीची चादर

वाशिंग्टन – करोना विषाणू महामारीमुळे पुढील एक-दीड वर्षात 15 कोटी जनता गरीब बनणार असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले आहे. जागतिक बॅंकेने म्हटले की, सर्वच देशात महामारी दरम्यान अनेक समस्या निर्माण झाल्या असून अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलला आहे. 2020 मध्ये 8 कोटी ते 11 कोटींपेक्षा अधिक जनता गरिबी रेषेत आली आहेत. 2021 पर्यंत ही संख्या 15 कोटींपर्यंत … Read more

करोनाच्या मोफत चाचण्या केवळ गरिबांसाठीच- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या मोफत चाचण्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुधारित आदेश दिला. त्यानुसार, करोनाच्या मोफत चाचण्या केवळ गरिबांसाठीच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याआधी न्यायालयाने 8 एप्रिलला खासगी प्रयोगशाळांनाही मोफत चाचण्या घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वांसाठी चाचण्या मोफत केल्यास खासगी प्रयोगशाळांवर आर्थिक ताण येईल. त्यातून चाचण्यांचा वेग … Read more

इंदोरीकर महाराजांतर्फे गरिबांना धान्य वाटप 

अहमदनगर : कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबासाठी प्रसिद्ध कीतर्नकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी मदत केली आहे. त्यांनी  संगमनेर तालुक्यातील  कोकणगाव, वडगापान  ओझर, रहिमपूर, येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले आहे. तसेच संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे १ लाखाचा धनादेश सुपूर्त केला आहे. यावेळी यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, रहिमपुर सरपंच बाजीराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गाढे, उपसरपंच रामदास शिंदे, पत्रकार स्वानंद … Read more