नगर | सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी पोस्टमन करणार सर्वेक्षण

नगर, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोचविण्यासाठी पोस्ट खात्याची निवड झाली आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी पीएम सूर्यघर नावाचे ॲप तयार केले आहे. लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. देशभरात एक कोटी घरांमध्ये … Read more

‘पोस्टमन’ देणार हयातीचे प्रमाणपत्र; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबणार

पुणे – केंद्र तसेच राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) पेन्शन विभागाकडे डिसेंबरपर्यंत सादर करावा लागतो. आता हा दाखला पोस्टमनही देऊ शकणार आहेत. पुणे ग्रामीण डाक विभागाकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला वेळेत संबंधित विभागाकडे जमा न केल्यास … Read more

पिंपरी चिंचवड – डिजिटल लाइफ सर्टीफिकेटची पोस्टमनकडून घरपोच सुविधा

पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) -राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या जुन्या पेन्शनसाठी अर्थात सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र कर्मचाऱ्यांना जिवंत असलेला पुरावा म्हणून जीवन प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाइफ सर्टीफिकेट (डीजेएल) सरकारकडे सादर करावे लागते. ही सुविधा शहरातील 114 पोस्टमन देणार असून चिंचवड ईस्ट येथेही सुविधा उपलब्ध असणार आहे. सेवानिवृत्ती वेतनासाठी वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र प्रत्येक केंद्र सरकार … Read more

पोस्टमन “मोबाइल” घेऊन येणार…

पुणे – आधारकार्डमध्ये मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी अपडेट करणे अथवा लिंक करणे, ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. ही दोन्ही कामे करण्यासाठी आता आधार केंद्रांमध्ये जाण्याची गरज नाही, आता पोस्टमन यांच्यामार्फत या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. पोस्टमन यांच्याकडे असलेल्या मोबाइलऍपद्वारे आधारशी मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल आयडी लिंक करण्याची कामे घरबसल्या होणार … Read more

पोस्टमनने पेन्शन नव्हे करोना पोहोचवला

हैदराबाद – पोस्टमन येथील एका गावात निवृत्ती वेतनाचे धनादेश तसेच रोख रक्कम पोहोचविण्यासाठी आला होता. मात्र, तो स्वतः करोना बाधित असल्याचे त्याला समजलेच नव्हते. मात्र, आता त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास शंभर गावकऱ्यांनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हाच पोस्टमन गेल्या काही वर्षांपासून या गावातील निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे धनादेश तसेच रोख रक्कमेचे वाटप करण्यासाठी … Read more

दिवाळीमुळे ‘पोस्टमॅन’ची धावाधाव

भेटवस्तू वाटपाचा ताण : अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय कसरत पिंपरी – कधी सायकलवर तर कधी दिवसभर पायपीट करून नागरिकांपर्यंत दिवाळीची शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू पोहचविण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. अपुरे मनुष्यबळ त्यातच भेटवस्तू, टपाल दिल्यानंतर त्याचे मोबाईलवर स्कॅनिंग करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी हे काम वेळखाऊ ठरत आहे. टपाल खात्याच्या पुणे पुर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश … Read more

विज्ञान युगात टपाल पेटी गायब

सुख-दुःखाशी अतूट नाते सांगणारी टपाल पेटीबाबत होती आस्था  सोनई  – विज्ञानाच्या युगात व कॉम्प्युटर, मोबाइल क्रांतीमुळे टपाल पेटी आता अडगळीत पडली आहे. टपालदिनानिमित्त आता फक्त या टपाल पेटीच्या आठवणींना आता उजाळा देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखाशी अतूट नाते निर्माण करणारी टपाल पेटी आता अडगळीत पडली आहे. आजच्या विज्ञानयुगात टपालची किंमत जरी कमी झाली, तरी काही … Read more