अंबानींच्या सुरक्षेबाबत तपशील मागणारा निर्णय स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली – भारतातील ज्येष्ठ उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या सुरक्षेचा तपशील मागणारा त्रिपुरा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. याविरोधात त्रिपुरा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना … Read more

राहाता : प्रभाग रचनेला स्थगिती;अनेकांचे चेहरे फुलले

– बाळासाहेब सोनवणे राहाता – नव्याने झालेली प्रभाग रचनेला चार दिवसात स्थगिती मिळाल्याने फीलगूड असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडले, तर नैसर्गिक सीमांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याने नाराज झालेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून लागल्याचे चित्र राहाता शहरात सोमवारी प्रभाग रचनेला स्थगिती मिळाल्यानंतर पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाने 11 मार्च रोजी नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक लांबणीवर; राज्यपालांनी प्रस्ताव परत पाठविला

मुंबई – विधानसभा अध्यक्षपदीा निवडणूक गेल्या अनेक महिल्यांपासून रखडली असून ती आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पुन्हा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव त्यांनी परत पाठविला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास … Read more

दिल्ली पालिकेच्या निवडणुका लांबणीवर

अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारवर आगपाखड देश आणि लोकशाही कमकुवत होतेय नवी दिल्ली – आम आदमी पक्षाला पंजाबात प्रचंड बहुमत मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार मतप्रदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुका निर्धारित वेळेत होऊ द्याव्यात, असे … Read more

ओबीसींसाठीच्या राखीव जागांवरील निवडणुकांना स्थगिती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, … Read more

माहिती तंत्रज्ञान नियमांमधील काही तरतूदींना स्थगिती

मुंबई – नव्याने लागू करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांमधील काही तरतूदींना मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी स्थगिती दिली. ऑनलाईन प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मने आचारसंहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे या नियमावलीमध्ये म्हटले आहे.  या नियमावलीमधील 9 क्रमांकाच्या नियमातील उपनियम 1 आणि 3 अंतर्गत मार्गतर्शक सूचना आणि डिजीटल मीडिया नतिक मूल्ल्यांची अंमलबजावणी करणे सक्तीचे करण्यात … Read more

मोठी बातमी : 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही; आदेशाला स्थगिती

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून निर्बंध शिथील करण्यात येत आहे. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या मात्र या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश काढला होता. … Read more

फडणवीसांच्या आणखी एका निर्णयाला ठाकरे सरकारने दिली ‘स्थगिती’

पुणे – कृषी, औद्योगिक, व्यावसायिक आणि रहिवासी या कारणासाठी राज्य शासनाने दिलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग 2 अशी नोंद असते. या जमिनींचा मालकी हक्क संबधितांना देण्यासाठी भोगवटादार वर्ग 2 जमिनींचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपातंरण करण्याचा देण्याचा निर्णय मागील सरकारच्या काळात घेण्यात आला होता. आता या निर्णयाला महाविकास आघाडीने स्थगिती दिली आहे. गरजू व्यक्तींना याचा … Read more

पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

पुणे(प्रतिनिधी) – पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणूकांमध्ये मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने कोणतीही प्रयत्न केले नाहीत. एकूण पदवीधरांच्या केवळ 3 टक्के मतदार मतदार नोंदवून आमदार निवडणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. यासाठी पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्या किंवा निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली. … Read more

माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्या शिक्षेला स्थगिती

  नवी दिल्ली-माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना ठोठावण्यात आलेल्या 3 वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेला मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याशिवाय, रे यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवरून सीबीआयला नोटीस बजावत उत्तर मागवले. कोळसा खाणवाटप घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. त्या न्यायालयाने रे यांच्यासह चौघा दोषींना 3 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. वरिष्ठ न्यायालयात … Read more