satara | वाढत्या तापमानाचा कुकुटपालनावर परिणाम

सातारा, (प्रतिनिधी)- तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून वाढत्या उष्णतेचा कुकुटपालनावर परिणाम होत आहे. कोंबड्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून या प्रकारामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेक व्यावसायिक एप्रिल व मे महिन्यात कोंबड्यांचे पालन करण्यास धजावत नाहीत. उष्णतेच्या लाटेत कुकुटपालनातून मालाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत चिकनचे दरही तेजीत … Read more

या गावात केली जाते सापांची शेती, साप पालनातून लोक करोडोंची कमाई करतात

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि येथे लोक धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवतात.  तसेच मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि इतर अशी कामे देखील शेतीशी संबंधित केली, परंतु जर तुम्हाला सांगितले गेले की तुम्ही सापांची शेती करा, तर तुम्ही देखील आश्चर्यचकित  व्हाल. तसे, आज आम्‍ही तुम्‍हाला सापांशी संबंधित शेती आणि त्यातून मिळणार्‍या प्रचंड कमाईची माहिती देणार आहोत. साप … Read more

पोल्ट्री उद्योगाला बर्ड फ्लूची धास्ती

चिकन, अंड्यांच्या भावात घट : करोनानंतर नव्या साथीने कंबरडे मोडणार – विजयकुमार कुलकर्णी पुणे – “चिकन खाल्याने करोना होतो,’ अशी अफवा काही महिन्यांपूर्वी पसरली होती. त्यावेळी खवय्यांनी भीतीपोती चिकनकडे पाठ फिरवली. त्यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता बर्ड फ्लूच्या भीतीने पुन्हा नागरिक चिकन आणि अंडी खाणे टाळत आहेत. परिणामी, शहरात चिकन … Read more

कोरोना विषाणूचा पोल्ट्री व्यवसायाला फटका

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसायला सुरवात झाली आहे. चिकन खाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होता अशा अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. कोरोना विषाणुमुळे राज्यात जवळपास ७०० कोटीचे नुकसान झाले असून, पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी चिकनचे भाव १० रुपये किलोपर्यंत घसरले आहे. कोरोनाच्या अफवेमुळे … Read more

‘करोना’चा फटका; पोल्ट्री उद्योग अडचणीत

सरकारकडे मदतीची मागणी : मका, सोयाबीन उत्पादकांवरही परिणाम पुणे – चिकन खाल्ल्यामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होतो, अशा अफवा पसरल्यामुळे गेल्या महिनाभरात पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या उद्योगाला मदत जाहीर करण्याची गरज आहे, असे पोल्ट्री उद्योजकांची संघटना “एआयपीबीए’ या संघटनेने म्हटले आहे. या उद्योगाचे फेब्रुवारीत 1,750 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्रीचा उत्पादन … Read more

पोल्ट्री उद्योगालाही ‘करोना’चा संसर्ग!

मागील 20 दिवसांत सुमारे 120 कोटींचे नुकसान : पशुसंवर्धन विभागाचा अंदाज जनजागृतीमुळे बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर पुणे – चीनमधील “करोना’ विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातच या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यामुळे मांसाहाराची मागणी घटल्याने गेल्या 20 दिवसांत पोल्ट्री उद्योगाचे सुमारे 120 कोटींचे नुकसान झाले आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला … Read more

बॉयलर कोंबडीचे दर कडाडले

पाण्याअभावी पोल्ट्रीशेड बंद असल्याचा परिणाम मंचर – पाण्याअभावी पोल्ट्रीशेड बंद असल्याने बॉयलर कोंबडीचे दर कडाडले आहेत. लग्नसराई, वाढदिवस यामुळे बॉयलर चिकनला मागणी वाढली असून पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आंबेगाव तालुक्‍यात चिकनचे दर वाढले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने पोल्ट्रीशेड पाण्याअभावी बंद ठेवण्याची वेळ पोल्ट्रीचालकांवर आली … Read more