ठरलं ! राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ‘हा’ नेता जाणार राज्यसभेवर..

NCP Ajit Pawar group Rajya Sabha : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच 3 वर्षे आधी … Read more

शरद पवारांच्या अडचणी थांबेना ! निवडणूक आयोगाने दिलेलं नवीन पक्षाचं नाव केवळ 20 दिवसचं टिकणार..नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर..

sharad Pawar : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” असं … Read more

नवाब मलिकांमुळे अजित पवार गटाची कोंडी ?

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर आज दुसरा दिवस सुद्धा मलिक यांच्या भूमिकेवरून अजित पवार गटाला कोंडीत धरण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. मलिक यांनी आज सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावत काल बसलेल्या ठिकाणी जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेत बचावात्‍मक … Read more

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यू; प्रफूल्ल पटेल यांनी दिली माहिती

Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी ट्‌विट करत ही माहिती दिली. आजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्‌वीट केले आहे. ट्‌विटमध्ये पटेल यांनी … Read more

अजित पवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; जयंत पाटील म्हणाले,“नोशनलिस्ट पार्टीला…”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

युपीए कशाला? पवारांना कॉंग्रेसचेच अध्यक्ष करा – आठवले

नागपूर – संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आल्यानंतर खुद्द पवारांनी अशी काही चर्चा नसल्याचे सांगून, त्या वादावर नुकताच पडदा टाकला होता. मात्र, आता भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पुन्हा हा विषय नागपूरात काढून चर्चेची राळ उडवून दिली आहे. करोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी … Read more

मुख्यमंत्री-रेल्वेमंत्र्यांच्या वादात राष्ट्रवादीकडून पियूष गोयल यांच्या कामाचे कौतुक

मुंबई – लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित विविध राज्यात अडकले आहेत. त्यांना स्वगृही नेण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मात्र, यावरून आता  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात वाद झाला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे … Read more

आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार – प्रफुल पटेल

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील सत्तासमीकरणांच्या जुळवाजुळवीचा प्रश्न अधिक किचकट बनला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आम्ही विरोधातच बसणार असून जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे भाजप-शिवसेनेत पेच निर्माण होणार आहे. कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार … Read more

इक्‍बाल मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाही!

– प्रफुल्ल पटेल यांनी आरोप फेटाळले – 18 ऑक्‍टोबरला ईडीच्या चौकशील राहणार हजर मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्‍बाल मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक संबंध नाहीत. ज्या व्यवहारावरून आरोप केला जात आहे तो व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आहे असा दावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावरील सर्व आरोप पेैटाळून लावले. … Read more