जामखेडला वादळी पावसाचा जोरदार तडाखा, झाडे पडली उन्मळून; महावितरणचे नुकसान

जामखेड – वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काल शनिवारी दुपारी 4 वाजता अचानक हजेरी लावली. काही मिनिटांसाठी जोरदार सुटलेल्या वादळी वाऱ्यात रस्त्यावरील झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून वीजवाहक तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले. आरोळे नगर येथे विजेचा खांब आडवा झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्‍यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच … Read more

मुसळधार पावसाने नदीला पूर; श्रीगोंद्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

श्रीगोंदा – शहरासह तालुक्‍याच्या बहुतांश भागात काल मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने महावितरणचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, तालुक्‍यातील चिखली शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने चाळीशी पार केली होती. परिणामी, सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व … Read more

मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहावे – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

इस्लामपूर : पावसाळ्या पूर्वीच्या कामांसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

इस्लामपूर (प्रतिनिधी) : पावसाळ्या पूर्वी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना व अस्वच्छ रिकाम्या प्लॉट धारकांना नोटीस देणे, शहरातील गटार प्रवाहित करण्यासह शहरात नियमित औषधे फवारणीचा निर्णय नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला. दहा जूनपर्यंत पावसाळ्या पूर्वीची कामे व्हायला हवीत अशी मागणी नगरसेवकांनी केली. पावसाळ्या पूर्वीच्या कामांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजारामबापू पाटील नाट्यगृहात नगराध्यक्ष निशिकांत … Read more

मध्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे हाती

पावसाळ्यात रेल्वे संचलनात येणारे अडथळे कमी करण्याचा प्रयत्न – कल्याणी फडके पुणे – मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतात. दरवर्षी प्रशासनाकडून याबाबत उपाययोजनादेखील करण्यात येतात. यंदा मध्य रेल्वेकडून एप्रिलमध्येच मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून पावसाळ्यात रेल्वे गाड्यांच्या संचलनात येणारे अडथळे कमी करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये रुळांवर पाणी … Read more