तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्‍या देऊ नका – संजय राऊत

नागपूर – सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्‍या देऊ नका, असा थेट इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मुंबईत येऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करायचे असेल … Read more

पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी : अमरिंदर सिंग

फिरोजपूर -पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्यात कॉंग्रेस सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. फिरोजपूरमधील सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमरिंदर प्रथमच एका व्यासपीठावर येणार होते. मात्र, सुरक्षाविषयक त्रुटीशी संबंधित घटनेमुळे सभेला उपस्थित न राहता मोदी दिल्लीला परतले. त्यावरून सभेनंतर … Read more

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; न्यायालयाने मागवले केंद्र सरकारकडून उत्तर

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरून न्यायालयाने गुरूवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागवले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उसळला. त्यामुळे त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. ती याचिका उत्तरप्रदेशस्थित वकील रंजना अग्निहोत्री आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंदर … Read more

दिल्लीत करोनाचे संकट हाताबाहेर; राष्ट्रपती राजवट लावण्याची AAP आमदाराची मागणी

नवी दिल्ली, दि. 30- दिल्लीत करोनाचे संकट हाताबाहेर गेल्यानंतर आम आदमी पार्टीमध्ये असंतोष वाढतो आहे. आम आदमी पार्टीचे आमदारच आता केजरीवाल सरकार करोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. आपचे वरिष्ठ नेते आणि आमदार शोएब इकबाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील स्थिती गंभीर आहे. केजरीवाल सरकार करोना संकटाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरले आहे. … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नवनीत राणांचं अमित शाह यांना साकडं

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणामुळं राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आलं आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला सतत धारेवर धरण्यात येत आहे. या प्रकरणांचा आधार घेत खासदार नवनीत राणा यांनी राज्यात कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना साकडं घातलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; भाजपच्या मोठ्या नेत्याची अमित शाह यांच्याकडे धाव

मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विरोधी पक्ष भाजपकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला अटक झाली. या मुद्दावरून भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री … Read more

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली  – उत्तर प्रदेशात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी बोकाळली असून तेथील घटनात्मक यंत्रणा संपूर्णपणे कोलमडली असल्याने तेथील सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने ही याचिका करणाऱ्या वकिलाकडून कोर्ट कामकाजाचा खर्चही वसूल करण्याचा आदेश दिला आहे. … Read more

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा किंवा मुख्यमंत्री बदला – मायावती

लखनौ – हाथरस आणि बलरामपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन बसपच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून योगी आदित्यनाथ यांना हटवावे किंवा त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. योगी महिलेच्या पोटी जन्माला आले. त्यांनी इतरांच्या मुली-बहिणींबाबत आपलेपण ठेवायला हवे. त्यांचे … Read more

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे

sanjay raut angry statement

मुंबई :  देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे  राज्याच्या राजकारणामध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. याविषयी सर्वात महत्वाचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विरोधकांनी … Read more

राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात; अधिसूचना जारी 

नवी दिल्ली – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सत्तासमीकरण अस्तित्वात आल्यानंतर राज्यातून राष्ट्रपती राजवट हटविण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राजभवनात ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. The notification revoking President’s rule in Maharashtra pic.twitter.com/JSbAIOFUE6 — … Read more