Kia India ने 1 एप्रिलपासून लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची केली घोषणा

मुंबई  – कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे काही वाहन कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली. त्याचबरोबर काही कंपन्या दरवाढ जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत किया कंपनीने आपल्या वाहनाच्या दरात तीन टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. (Kia India Announces Up To 3 Percent Price Hike On Popular Models From April 1) ही दरवाढ 1 एप्रिल 2024 … Read more

अहमदनगर – सिमेंटमध्ये प्रतिगोणी 40 रुपये भाववाढ

नगर – बांधकामांसाठी अत्यावश्‍यक सिमेंटच्या दरात गेल्या सहा दिवसांत प्रतिगोणी 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. सिमेंट दरवाढीतून बांधकाम खर्च वाढला आहे, त्याचा सर्वाधिक सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सिमेंट पोत्याचा दर हा 330 वरुन 370 रुपयांवर गेला आहे. अर्थात किरकोळ दुकानात 350 वरून 410 रुपयास … Read more

पुन्हा खिशाला कात्री! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ‘एवढ्या’ रुपयांची वाढ; वाचा तुमच्या शहरातील दर किती?

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर येत आहे. कारण तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 7 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत … Read more

महागाईचा चटका! अमूलचे दूध महागले; लिटरमागे एवढ्या रुपयांची वाढ

गुजरात –  गुजरात को. ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) शनिवारी राज्यात अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. खरं तर, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF), ही गुजरातराज्यातील दूध सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था आहे, जी सहसा दुधाच्या दरात वाढ … Read more

महागाईचा कळस! पाकिस्तानात पेट्रोल २५०, तर डिझेल २६३ रुपये प्रतिलिटर

इस्लामाबाद :  पाकिस्तानमध्ये अगोदरच महागाईने कळस गाठला आहे. त्यातच आता पाकच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर चक्क प्रतिलिटर ३५ रुपयांनी वाढविले. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या दरवाढीनंतर प्रतिलिटर पेट्रोलचा दर २४९ रुपये ८० पैसे, हाय स्पीड डिझेल- २६२ रुपये ८० पैसे, तर केरोसिन- १८९ रुपये ८३ पैसे, हलके … Read more

वीज “दरवाढीचा शॉक’ बसणार ?

पुणे – करोनामुळे झालेले नुकसान, वीज गळती, खासगी वीज निर्मिती कंपनीला द्यावे लागणारे जादा पैसे आणि वीज खरेदी दरात झालेली वाढ आदी कारणांमुळे महावितरणने वीज नियामक आयोगाकडे फेरयाचिका दाखल करून वीज दरवाढीची मागणी केली आहे. यावर लवकरच सुनावणी घेऊन वीज दरवाढीचे प्रारुप वीज ग्राहकांसाठी जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहे. या दरवाढीला … Read more

पीएम मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचे महागाईविरोधात आंदोलन; म्हणाले,”ही तर आमची क्रूरचेष्टा”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन सुरु केले आहे. ते ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’चे उपाध्यक्ष आहेत. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी ते मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनात बसले. यावेळी संघटनेचे इतरही सदस्य आंदोलनासाठी उपस्थित होते. देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद मोदी आंदोलनादरम्यान सरकार विरोधी … Read more

भारतातच नव्हे तर इतर देशांतही दरवाढ; भाजपने महागाईसाठी जागतिक घडामोडींना धरले जबाबदार

नवी दिल्ली  – महागाईच्या मुद्‌द्‌यावर मंगळवारी राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी सत्तारूढ भाजपने महागाईसाठी जागतिक घडामोडींना जबाबदार धरले. वाढत्या महागाईवरून विरोधकांनी राज्यसभेत मोदी सरकारला धारेवर धरले. महागाईची समस्या सोडवण्यासाठी आधी ती असल्याचे मान्य करा, असे उपहासात्मक आवाहन विरोधकांनी सरकारला केले. त्या चर्चेत भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सहभागी झाले. महागाई सगळ्यांनाच प्रभावित करते. महागाईला … Read more

Price Hike: सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या निमित्ताने एकीकडे केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे दिवसागणिक डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवणाऱ्याच आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना आता सीएनजीच्या वापरासाठी आज मध्यरात्रीपासून जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरातही काही महिन्यांत सातत्याने … Read more

टाटा मोटर्सकडून दरवाढ जाहीर ; इंधनाचे दर वाढत असल्यामुळे हा निर्णय

मुंबई – कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे बऱ्याच प्रवासी वाहन कंपन्यांची दरवाढ चालूच आहे. टाटा मोटर्स या कंपनीने शनिवारी आपल्या विविध वाहनांच्या दरात 1.1 टक्‍क्‍यापर्यंत वाढ जाहीर केले आहे.ही दरवाढ विविध वाहनासाठी वेगवेगळी असेल असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे 23 एप्रिल पासून सुरु झाली आहे. ऍल्युमिनियम, … Read more