पात्र व्यक्तीला मंदिरात पुजारी म्हणून नेमा

चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरांमधील पुरोहितांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मंदिरांमध्ये पुजारी नेमताना योग्य आणि पात्र व्यक्तीची नियुक्ती करावी, त्यात जातीचा निकष असू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, पुजारी नेमताना ती व्यक्ती पात्र आहे की नाही हेच पाहिले पाहिजे. तसेच, व्यक्ती त्याच्या कामात पारंगत असावी, प्रशिक्षित असावी आणि आवश्‍यकतेनुसार … Read more

धक्कादायक! बंगळुरूमध्ये महिलेला फरपटत मंदिराबाहेर काढले; वाचा नेमकं काय कारण ?

मुंबई : बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पुजाऱ्याच्या अंगावार थुंकल्याचा आरोप करत तिला चक्क फरपटत मंदिराबाहेर नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेल्या तक्रारीनंतर मंदिराच्या पुजाऱ्यासह कर्माचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनीसार, २१ डिसेंबर रोजी एक … Read more

#SAvIND 3rd Test | कोहलीची पुजाराच्या रुपात फलंदाजी

केपटाऊन – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ज्या पद्धतीने संथ फलंदाजी करत होता त्यावर नेटीझन्सनी टीका केली आहे. कोहली चेतेश्‍वर पुजारासारखा फलंदाजी करत आहे, अशा शब्दात त्याच्यावर सध्या ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत. पहिली कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे कोहलीने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर पूर्ण तंदुरुस्त ठरल्यावर त्याने तिसरी व … Read more

हातात भगवान’श्री कृष्णा’ची मूर्ती अन् डोळ्यात पाणी; पुजाऱ्याच्या विनंतीनंतर डॉक्टरांनी केले मूर्तीवर उपचार

नवी दिल्ली : आजपर्यंत देवाची भक्ति-भावाने पूजा केलेली किंवा मंदिरात कोट्यवधींच्या देणग्या दिल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. परंतु, कधी कोणी देवाच्या मूर्तीचा हात तुटला म्हणून ती मूर्ती दवाखान्यात नेल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही अजब-गजब घटना सत्यात घडली आहे. झालं असं कि, आग्राच्या सरकारी दवाखान्यात लेख सिंह नावाचे … Read more

मंदिरातच गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या; स्थानिकांच्या बेदम मारहाणीमुळे एका हल्लेखोराचा जागीच मृत्यू

दरभंगा: बिहारच्या दरभंगामध्ये एका पुजाऱ्याची मंदिरातच गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरभंगातील राज संकुलात असलेल्या कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज पहाटे 4.30 च्या सुमारास राजीव झा पूजा करत असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 हल्लेखोर कारमधून मंदिरात … Read more

पुजाऱ्याचे ह्लदयविकाराच्या धक्क्याने निधन; घटस्थापनेदिवशी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ

कोल्हापूर – कागल तालुक्यातील बोरवडे येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरातील मुख्य पुजारी यांचे पुजेची तयारी करतेवेळी ह्लदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जोतिराम शामराव गुरव (वय 42) असे निधन झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ऐन दसऱ्याच्या तोंडावरच घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बोरवडे येथे दसरा महोत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात … Read more

“पेटलेली चिता विझवली अन् माझ्या मुलीच्या पायाला पकडून तिचा मृतदेह बाहेर काढला”

नवी दिल्ली :  देशाची राजधानी पुन्हा एकदा एका अल्पवयीन  मुलीवर झालेल्या बलात्काराने हादरली आहे.  दरम्यान मुलीचा बलात्कार करून हत्यादेखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद थेट संसदेत पडत असल्याचे दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  निर्माण केले आहे. पीडिताच्या आईवडिलांनी आरोप केला की, माझ्या मुलीसोबत बलात्कार झाला … Read more

मंदिराच्या पुजाऱ्याला जिवंत जाळले

जयपूर – जमिनीच्या वादातून मंदिराच्या पुजाऱ्याला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. त्या पुजाऱ्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील एका गावात असणाऱ्या मंदिराच्या जमिनीवरून वाद निर्माण झाला होता. एक गट ती जमीन बळकावू पाहत होता. त्यातून बुधवारी पाच आरोपींनी मंदिराचे पुजारी बाबूलाल वैष्णव यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. त्या … Read more

शिरूर : मुखईच्या मंदिरातील पुजाऱ्यावरील प्राणघातक हल्ला कॅमेऱ्यात कैद

केंदूर (प्रतिनिधी) – मुखई (ता. शिरूर) येथील काळभैरवनाथ मंदीरात दि. १९ रोजी मंदिरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन चोरट्यांनी मंदिराच्या पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तो संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  काळभैरवनाथ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागून आलेल्या तीन चोरट्यांनी मिळून मंदिराच्या दरवाजात झोपलेल्या पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवला. परंतु मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्याच्या मुलाला याची … Read more