स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?

उपचार करण्यापेक्षा नेहेमी अटकाव करणे केव्हाही श्रेयस्कर- एनसीडी प्रकारात मोडणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाविषयी हे अक्षरशः खरे आहे. या घातक आजाराला जीवनशैलीतील सुदृढ बदल आणि नियमित आरोग्य तपासणीतून प्रतिबंध घालता येतो. स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूक असणे, या रोगाचे प्रारंभिक अवस्थेतच निदान होण्यासाठी पावले उचलणे, आणि इतरांनाही तसे करण्यासाठी प्रोत्साहन देणे, यांमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून उत्तम प्रकारे अटकाव करतायेतो. … Read more

गुडघे, पोटऱ्या, मांड्या, गुप्तांगाला व्यायाम मिळणारा स्थितऊर्ध्वपाद विस्तृतासन

हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घेऊन पसरवावे. श्‍वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत.मग दोन्ही पाय साधारण एक ते दीड फुट जमिनीपासून वर घ्यावेत आणि कुंभक करावा. हे आसन करताना आपले पाय आणि आपले हात दोन्ही सरळ रहायला हवेत. आपले सीट हे … Read more

पीरियरोन्डिटिस हिरडीचा आजार होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

जागतिक आरोग्य संघटनेनेफ (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार जगभराच्या लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांना कोणता तरी हिरडीचा विकार जडलेला असतो. तसेच जागतिक लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोकांना हिरडी संदर्भाच्या पीरियरोन्डिटिस या विकाराने ग्रासलेले आहे. पीरियरोन्डिटिस विकारात काय काळजी घ्याल? ( periodontitis treatment ) पीरियरोन्डिटिस हिरडीचा आजार होऊ नये म्हणून घरबसल्या सुचविला जाणारा उपचार म्हणजे दिवसातून दोन वेळा ब्रशने दातांची … Read more

वात व पित्तनाशक ताडफळाचे जाणून घ्या फायदे

ताडफळाचे झाड (बोरगॅस फ्लॅबीझीफर) खूपच उपयोगी आहे. त्याच्या पातीपासून छत्र्या, पंखे बनवितात. खोड घराचे बहाले व पन्हाळे बनविण्यास उपयोगी आहे. आश्‍चर्य म्हणजे सिंहल द्वीप, कर्नाटक, द्रवीड येथे अजूनही ताडपत्रावर पोथ्या लिहितात. ताडपत्राची पाने दूध पाण्यात उकळून वाळवतात व लोखंडी खिळ्यांचा उपयोग लेखणीसारखा करून त्यावर मजकूर लिहितात. या ताडपत्रावर मजकूर कागदापेक्षा खूप वर्ष अर्थात्‌ वर्षानुवर्ष टिकतो. … Read more

छोटीशी असली तरी बहुगुणी बडीशेप ; जाणून घ्या फायदे

काही वेळा गॅसेसने किंवा अतिखाण्याने पोट फुगते व दुखू लागते. जास्त दूध प्यायल्यामुळे पोटात गुबारा धरतो व त्रास होऊ लागतो. अशावेळी बडीशेप अतिशय उपयोगी पडते. पोट फुगू नये म्हणून रोज रात्रीच्या वेळी 1 चमचा बडीशेप अर्धा कप पाण्यात भिजू द्यावी. सकाळी ती हाताने बारीक करून ते पाणी गाळून घ्यावे. या पाण्याला दुधात मिसळून लहान मुलांना … Read more

झटपट चरबी घटवायची, तर ‘या’ स्मार्ट टिप्स नक्की फॉलो करा

पुणे – येथे आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो केल्यामुळे केवळ 10 दिवसांत पोटाची चरबी वितळेल, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल, तेही नैसर्गिक पद्धतीने. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकलयुक्‍त औषध न घेता. यासाठी तुम्हाला एक चूर्ण खावे लागेल. हे चूर्ण तुम्ही घरी बनवू शकता, ते ही अगदी कमी खर्चामध्ये. यासाठी तुम्हाला तीनच … Read more

मकरसंक्रांत आणि तीळगूळ

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बनवले जाणारे तीळगुळ विशेष आरोग्यदायी आहे. तीळ व गूळ या दोन्हीमध्ये मूलतः उष्ण गुणधर्म असल्याने ऐन कडाक्‍याच्या थंडीत येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगूळ खाण्याची/वाटण्याची पध्दत असावी. तीळ व गुळ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते. तीळ व गुळामध्ये … Read more

कोविड-19 मुळे रुग्णांच्या हृदययावरील ताण वाढला

जागरूकता असूनही महामारीच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांच्या वार्षिक तपासणीचे करोनापूर्वी असलेले 92 टक्‍के प्रमाण करोनाच्या काळात 77 टक्‍क्‍यांवर घसरले आहे. महामारीमुळे लागलेले लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येऊ लागल्यानंतर तपासणीचे प्रमाण 83 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हृदयविकाराचे निदान झालेल्या व्यक्‍तींपैकी 56 टक्‍के व्यक्‍तींना स्वतः कोविडचा संसर्ग झाला तर 25 टक्‍के व्यक्‍तींना त्यांच्यासोबत राहात असलेल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून संसर्ग झाला. हृदयविकारग्रस्त सर्व … Read more

वारंवार होणारी मळमळ बरी होरील का ?

 कधीतरी होत असलेल्या साध्या उपचारांनी बरी होणारी पण वारंवार होऊ लागल्यास आहारावर तसेच तब्येतीवर देखील परिणाम करणारी एक तक्रार म्हणजे मळमळ व अस्वस्थ करणाऱ्या मळमळ या तक्रारीविषयी- साधारणपणे मळमळीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींमध्ये मळमळ कमी करणारी, पित्ताची गोळी घेण्याची सवय जडलेली बघायला मिळते. मळमळ हा त्रास वारंवार होत असल्यास मात्र हा त्रास कशामुळे होत आहे त्याचा … Read more

नैराश्‍यावर ग्रासल्यास काय कराल ; काय टाळाल ?

नैराश्‍यावर मात करणे कठीण असले तरी अशक्‍य नाही. नैराश्‍य ही निव्वळ एक मनोवस्था नाही, ज्यातून झटपट बाहेर पडता येईल. यावरचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मदत घेणे. सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टसारख्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्यांना भेटणे, ही उपचारांमधली सर्वात महत्त्वाची पायरी आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये औषधोपचार आणि कौन्सेलिंग थेरपीजने चांगला फरक पडतो. नैराश्‍याने ग्रासलेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तीला कळू … Read more