सत्येंद्र जैन यांची तुरूंग वापसी

नवी दिल्ली  –सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना कुठला दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे जैन यांची सोमवारी तिहार तुरूंगात वापसी झाली. ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी त्यांना ३० मे २०२२ ला अटक केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २६ मे २०२३ ला त्यांना वैद्यकीय कारणांस्तव अंतरिम जामीन मंजूर केला. त्या जामिनाची मुदत वेळोवेळी … Read more

नगर – ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – नागापूर एमआयडीसी येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीस तसेच गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे सराईत तसेच एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २०, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती. पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील … Read more

प्रेयसीसह कुटुंबीयांच्या दबावातूनच कारागृहातील रक्षकाची आत्महत्या

पुणे – कारागृहातील रक्षकाने गोळी झाडून आत्महत्या प्रकरणाचे कारण उघडकीस आले आहे. घटनेच्या आठवडाभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण, हे लग्न केल्याप्रकरणी पूर्वाश्रमीच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर दबाव आणणे सुरू केले होते. यातून त्यांनी येरवडा कारागृहात दि. 27 फेब्रुवारी रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रेयसीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल … Read more

विदेशी कैद्यांसाठी व्हिडिओ कॉलिंग सुविधा; अमिताभ गुप्ता यांचे राज्यभरातील तुरूंग कार्यालयांना आदेश

पुणे -राज्यातील कारागृहांतील विदेशी कैद्यांना कुटुंबिय आणि नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधता येणार आहे. यासाठी “ई-प्रिझन’ प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत. यामधून पाकिस्तानी, बांगलादेशी आणि दहशतवादी कारवायातील कैद्यांना वगळण्यात आले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व कैद्यांसाठी ही सुविधा दि. 4 जुलैपासून उपलब्ध करुन देण्यात आली … Read more

विमानात सिगारेट ओढल्याचा दंड 25 हजार, आरोपी म्हणाला.. 250 मध्ये मिटवा; पाठवले कारावासात

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला 25,000 रुपये दंड ठोठावला होता. पण आरोपी फक्त 250 रुपये जमा करण्यावर ठाम होता. त्यावर न्यायालयाने आरोपीला तुरुंगात पाठवले आहे. रत्नाकर द्विवेदी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एअर इंडियाच्या लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये सिगारेट ओढणे आणि … Read more

शांततेचे नोबेल विजेत्या लेखकाला झाली 10 वर्षांची शिक्षा

मिन्सक, (बेलारुस) – शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बेलारुसचे लेखक ऍलेस बियालियात्सकी यांना स्थानिक न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऍलेस बियालियात्सकी यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. बियालियात्सकी हे वेसना ह्युमन राइटस सेंटर नावाने एक संघटना चालवत आहेत. ही संघटना नोंदणी झालेली नाही. या संस्थेचा निधी युरोपीयन आर्थिक संघटनेच्या सीमाशुल्क विभागाच्या सीमेपलिकडे पाठवल्याचा … Read more

फिल्मी स्टाईल सत्य घटना! गुंडाची कारागृहातून खंडणीची धमकी, कैद्याकडे तुरूंगात फोन आणि इंटरनेटही

हरिद्वार – येथील कारागृहात असलेला कुख्यात गुंड सुनील राठी याने हरिद्वारच्या कानखल येथे राहणाऱ्या व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. राठी याने व्हॉट्‌सऍपवर फोन करून पैसे न मिळाल्यास पाच जणांचा गट त्याचा रोशनाबाद येथील भूखंड ताब्यात घेईल, अशी धमकी दिल्याचे उघड झाले आहे. याआधीही राठीच्या टोळ्यांनी व्यापारी आणि त्याच्या भावाला शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले … Read more

कोरेगाव भीमात पोलिसांनी पकडलेल्या “त्या’ तिघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

शिक्रापूर –  कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १० ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा सराईतांना शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हत्यारासह पकडत जेरबंद केले होते. या गुन्ह्यातील हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, लखनसिंग राजपूत सिंग व रवीसिंग श्यामसिंग कल्याणी या तिघांना शिरूर न्यायालयाने एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे … Read more

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई  : कारागृहातील शिक्षाधीन बंदी ना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला … Read more

टीव्ही पाहण्यावरून कारागृहात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

कोल्हापूर – जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहामध्ये किरकोळ कारणांवरून 2 कैद्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत वृद्ध कैदी जखमी झाला आहे. सुरेश कचरू वैती (वय- 70) असे जखमी कैद्याचे नाव आहे, तो जन्मठेपेची सध्या शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहात कैदी टीव्ही पहात बसले होते. आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून … Read more