देशातील सामाजिक सलोखा बिघडला : पृथ्वीराज चव्हाण

पिंपरी – नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी “गांधी शांती यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून गांधी शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जिल्ह्यात उत्सुकता

संतोष पवार मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सातारा – राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शनिवारी बहुमत सिद्ध झाल्याने आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिंमंडळात जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागेल, पालकमंत्री कोण असेल, याची उत्सुकता जिल्हावासियांना लागून राहिली आहे. आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज … Read more

जिल्ह्यात आता वाघाची डरकाळी अन्‌ घड्याळाची टिकटिक

संदीप राक्षे पृथ्वीराज चव्हाणांसमोर कॉंग्रेसच्या पुनर्बांधणीचे आव्हान सातारा- राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा कळसाध्याय ठरेल, अशी राजकीय लढाई लढताना धुरंधरपणाने भाजपची रणनीती भेदण्यात यश मिळवले. महाविकाआघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याने जिल्ह्यात शिवसेनेला उभारी मिळणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घड्याळाची टिकटिक पुन्हा जोर धरणार आहे. या परिस्थितीत कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेतील मरगळ झटकून पुनर्बांधणी करण्याचे … Read more

कॉंग्रेस विधिमंडळ नेता व गटनेता निवड बारगळली

पाठिंबा पत्रावर आमदारांच्या सह्या घेऊन संपली बैठक मुंबई : कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित 44 आमदारांची शुक्रवारी दुपारी विधिमंडळातील पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ नेता व गटनेता निवडीऐवजी सरकार स्थापनेसाठी समर्थन म्हणून सर्व आमदारांच्या पत्रांवर सह्या घेण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपला विधिमंडळ गटनेता जाहीर केला असला तरी अद्याप कॉंग्रेसकडून मात्र विधिमंडळ … Read more

सत्ताधाऱ्यांना सरकार स्थापनेत रस नाही

कराड – महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिवृष्टीचे आज एक प्रचंड मोठे संकट आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही. यामुळे आम्ही आमच्यावतीने राज्यपालांना राज्याची सुत्रे हातात घ्या, असे निवेदन दिले आहे. सत्ताधारी सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांना सरकार स्थापनेत जास्त रस नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रेठरे खुर्द, … Read more

चारित्र्यसंपन्न राजकारणात यशवंतराव मोहिते अव्वल स्थानी

प्रतिभाताई पाटील; डॉ. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव वर्षास शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ कराड  – चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्व असलेले जे काही राजकारणी आहेत. त्यांच्यात यशवंतराव मोहिते यांचे नाव अव्वल स्थानी आजही आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द अत्यंत चांगली गाजऊन जनमानसात छाप उमटवली होती. ते तात्विक विचारांनी घट्ट होते आणि हे विचार व ध्येय त्यांनी जनमानसाच्या … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चव्हाणांवर घणाघाती टीका मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू झाला असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी रोज सभा घेत सरकार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले असल्याचे दिसत आहे. त्यातच आज त्यांची वणीमध्ये प्रचार सभा झाली यावेळी त्यांनी सरकारसह विरोधकांवरही टीका केली. यावेळी पाच वर्षांपूर्वी माजी … Read more

औद्योगिक मंदीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन का?

पिंपरी – नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात मंदीची लाट असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण सुटले आहे. वाहनउद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिक वाहन विक्रीचे शोरूम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, त्यांचे हे मौन का?, असा प्रश्‍न राज्याचे माजी मुख्यमंत्री … Read more

आमच्या नेतृत्वाला कोंडाळ्यानं घेरलंय

आ. आनंदराव पाटील : संघर्ष करून पुन्हा संघटनात्मक बांधणी करणार भाजपमध्ये जाण्याची हूल मी माझ्या बंधूच्या कामासाठी मंत्रालयात ना. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र बाबांच्या भोवती असलेल्या कोंडाळ्यांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याची हूल उठवली आहे. कराड  – स्व. प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी संघटना उभी करुन जिल्ह्यात लढत होतो. आता मात्र माजी मुख्यमंत्री … Read more

पृथ्वीराज एकाकी, रामराजे उंबरठ्यावर अन्‌ उदयनराजे कुंपणावर!

वैभवशाली दिवस पाहिलेल्या जिल्हा कॉंग्रेसची अवस्था “जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ आली,’ अशी झाली आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनविलेल्या सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस औषधालाही उरणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदीला उतरती कळा लागली. जनसंघाची पणती पेटविण्यासाठी कोणीच पुढे येऊ शकत नव्हते, अशा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मातब्बर … Read more