खाजगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील खाजगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे (VTI – Vocational Training Institute) विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी(दि.12) झालेल्या बैठकीत दिली. बैठकीस कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, … Read more

पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर; खळबळजनक माहिती उघड

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.  यातच  या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यावर प्रकाश टाकणारा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. … Read more

पूजा चव्हाण प्रकरणात खासगी खटला दाखल

पुणे – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 18 दिवस उलटूनही कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. दाखल केलेल्या खासगी खटल्यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे.     लीगल जस्टिस सोसायटीतर्फे भक्ती पांढरे यांनी 156 (3) नुसार ऍड. विजयसिंह ठोंबरे … Read more

लुटणाऱ्या खासगी रक्तपेढ्या रडारवर

पुणे  – करोनामुळे रक्त आणि प्लाझ्मा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थिती काही खासगी रक्तपेढ्या जादा पैसे घेऊन रक्त किंवा प्लाझ्मा देतात. त्याला चाप बसवण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नवीन अधिसूचना बुधवारी जारी केली. ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे. कारवाईचे अधिकार राष्ट्रीय अथवा … Read more

खासगी रेल्वेगाड्यांना त्यांच्या निर्णयानुसार भाडे आकारता येणार

नवी दिल्ली – देशात आता काही मार्गांवर खासगी रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. या रेल्वे गाड्यांच्या मालकांना त्यांच्या निर्णयानुसार रेल्वेचे भाडे आकारता येणार आहे त्याबाबत त्यांच्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, भाडे ठरवण्याचे त्यांना स्वातंत्र्य असेल पण त्या मार्गावर चालणारी विमाने … Read more

‘वायसीएम” रुग्णालयाला खासगी बाउन्सरचे सुरक्षा कवच

पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वायसीएममधील डॉक्‍टरांना झालेल्या धक्काबुक्की घटनेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्‍टरांचे सुरक्षाकवच वाढविले जाणार असून याठिकाणी खासगी बाउन्सरची नियुक्‍ती केली जाणार आहे. यामध्ये चार महिला व आठ पुरुष बाउन्सरचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ही खासगी सुरक्षा तैनात केली जाणार आहे. याकरिता येणाऱ्या सहा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव … Read more

खासगी ‘रक्षकांना’ सेवाकर नको

खासगी सुरक्षा उद्योगाला करातून वगळण्याचे पंतप्रधानांना साकडे नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत खासगी सुरक्षारक्षक सेवा अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहे. मात्र या उद्योगाचा महसूल आणि कार्यरत मनुष्यबळ पाहता त्या उद्योगाला सेवा करातून वगळण्याची गरज असल्याचे या उद्योगाने म्हटले आहे. देशातील विविध सुरक्षा रक्षक उद्योगांची संघटना असलेल्या सेंट्रल असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सेक्‍युरिटी इंडस्ट्री या संघटनेने … Read more

खासगी क्षेत्रात सात लाख नोकरभरती

नवी दिल्ली : 2020 मध्ये, खाजगी क्षेत्रात अंदाजे सात लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात हि बाब समोर आली आहे. मायहियरिंगक्लब.कॉम आणि सरकार-नौकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यात जास्तीत जास्त नोकऱ्या स्टार्टअमध्ये … Read more