लसीकरणाच्या डाटाबेसमध्ये खासगी डॉक्टरांचाही समावेश

पुणे  – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांचा समावेश करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांसोबतच सर्व खासगी डॉक्टरांनाही लस टोचण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती “आयएमए’ अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली.   केंद्र सरकारने … Read more

कराेना राेखण्यासाठी खासगी डाॅक्टरांना पुणे महापालिका प्रशासनाचे ‘नवे’ आदेश

पुणे  – सर्दी, फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती खासगी क्लिनिक्सनी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. सुमारे साडेतीन हजार दवाखाने, क्लिनिक आणि डिस्पेन्सरी यांना हे आदेश दिले आहेत.   करोनाची सौम्य लक्षणे असतानाच संबंधितांना वेळीच उपचार देऊन करोनामुक्त करणे तसेच दमा, “सारी’ या आजारावरही वेळेत उपचार करणे हा या मागचा … Read more

खासगी डॉक्‍टरांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी

मुंबई – करोनाच्या काळात खाजगी सेवा देणारे डॉक्‍टर आपल्या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातूनही करोना बाधित रुग्णांना ते वेगळी ट्रीटमेंट देत आहेत. यामुळे या डॉक्‍टर्सना करोनाची बाधा होत आहे. राज्यात आतापर्यंत अनेक डॉक्‍टर्स दगावले आहेत. केवळ ठाणे जिल्ह्यात पाच डॉक्‍टर्स करोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर 75 डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या अनेक … Read more

खासगी रुग्णालयांनी रुग्णसेवेसाठी सहकार्य करावे

कोल्हापूर – इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित करू. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोव्हिड रुग्णांवर खासगी रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयांनी पुढे येऊन रुग्ण सेवा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. कोल्हापूरमधील सीपीआर कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी सीपीआरमधून संदर्भात … Read more

पीपीई किटविनाच खासगी डॉक्‍टर करताहेत उपचार

सरकारने खासगी रुग्णालय, दवाखान्यांना पुरविली नाहीत अत्यावश्‍यक साधने विविध आजारांवरील शस्त्रक्रिया सुरू वाढली मागणी : बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ पिंपरी – गेले दोन महिने “करोना’मुळे सर्व काही ठप्प झाले होते. अत्यावश्‍यक मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला होता. अनेक शस्त्रक्रिया, उपचार पुढे ढकलण्यात आले होते. डॉक्‍टर देखील रुग्णांना फोनवरुन औषधे सांगत होते. … Read more

खासगी डॉक्टरांना राज्य सरकार पीपीई किट देणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना  व्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून खासगी डॉक्टरांना राज्य सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देणार आहे. तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, … Read more

‘तो’ दवाखान्यात आल्यावर करायचे काय?

खासगी डॉक्‍टरांचा सवाल : सर्व नियमांचे तंतोतंत पालन केल्यास करोनावर मात शक्‍य पुणे(प्रतिनिधी) – करोनाची चेन ब्रेक करण्यासाठीच सुरुवातीला डॉक्‍टरांनी आपले क्‍लिनिक बंद ठेवले होते. मात्र, आता जवळपास सगळीच छोटी-मोठी क्‍लिनिक सुरू असून सगळे डॉक्‍टर रुग्णसेवा देत आहेत. मात्र, जर एखाद्या रुग्णाला माहित नाही की आपणास करोना आहे. अशावेळी ‘तो’ दवाखान्यात आल्यावर करायचे काय? हा … Read more

करोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी 60 खासगी डॉक्‍टर्स

पुणे – शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ससूनमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील विविध हॉस्पिटलमधील 60 खासगी डॉक्‍टरांची सेवा अधिगृहित करण्यात आली आहे. आता हे डॉक्‍टर ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहेत. करोना संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न … Read more

खासगी 40 डॉक्‍टर्सही देणार सेवा

ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार : जिल्हाधिकारी पुणे – करोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा … Read more

खासगी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना अडवू नका

नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक अपर पोलीस आयुक्तांच्या सूचना  पुणे  – संचारबंदीत रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिकमध्ये जाणाऱ्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीमध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पाहावे, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबंधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडावे, अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यावर ठेवावेत. तर काही डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयात येऊन इतर रुग्ण तपासावेत, असे आवाहन पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले होते. त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेत, गेल्या दोन दिवसांपासून आपली क्लिनिक सुरू केली आहेत. तर काही पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यासाठी येत आहेत. पण, क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या स्टाफला देखील यावे लागते. मात्र, संचारबंदीमुळे डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ओळखपत्र पाहूनदेखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सोडले जात नाही. धायरी येथे पोलीस कर्मचाऱ्याने डॉक्टरांनी कर्मचाऱ्याला दिलेले पत्रच फाडल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्त यांच्याकडे आल्या होत्या. त्यावर हे आदेश देण्यात आले आहेत.