पिंपरी | वाळवंटातील जहाज वाढवताहेत उद्योगनगरीत कार्यक्रमांची शोभा

पिंपरी, (प्रतिनिधी) – वाळवंटातील उष्ण वातावरणाशी जुळवून घेत, वेगाने धावणार्‍या उंटाला पोटापाण्यासाठी आता उद्योगनगरीकडे धाव घ्यावी लागत आहे. एप्रिल व मे महिन्यात असलेल्या महापुरुषांच्या जयंत्या, लग्न समारंभ व शोभायात्रांकरिता उंटांना मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून उद्योगनगरी व परिसरात या व्यावसायिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वर्षभर उंटांचा सांभाळ करणार्‍या व्यावसायिकांचा उन्हाळ्यातील पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा … Read more

पुणे जिल्हा : परिंचेत नवागतांची बैलगाडीतून मिरवणूक

विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत दिल्या घोषणा परिंचे – पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील जिल्हा परिषद शाळेत बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांची गावामधे ढोल लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत घोषणा दिल्या. यावेळी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता. सुंदर रांगोळी, शालेय सजावट करून सुशोभीकरण करण्यात आले होते. केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर यांच्या … Read more

पुणे जिल्हा : बारामतीतील शोभायात्रेत ढोलवादन

शहरवासियांचे लक्ष वेधले : विविध कार्यक्रम बारामती – दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल जैन समाजाच्या वतीने बारामतीत महावीर जन्मकल्याणकनिमित्त महावीर पथवरील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन युवकांच्या ढोल पथकाने पारंपरिक पध्दतीने ढोलवादन केले. शोभायात्रेमध्ये दिगंबर, श्र्वेतांबर व स्थानकवासी जैन समुदायाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प.पू. प्रवचनकार … Read more

पुणे जिल्हा | शोभायात्रेत हजारो अनुयायांनी सहभाग

बारामती, (वार्ताहर)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती बारामती शहर आणि परिसरात उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडली. मध्यरात्रीपासून शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायींनी गर्दी केली होती. यावेळी सकाळी 9:30 वाजता प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे … Read more

पुणे जिल्हा : निवृत्त सैनिक भालेराव यांची काढली गावातून मिरवणूक

सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल केला नागरी सत्कार मंचर – कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी वस्तीवरील सैनिक सचिन शांताराम भालेराव यांनी भारतीय सैन्य दलात शिपाई ते हवालदार या पदापर्यंत २४ वर्षे अविरत सेवा बजावली. शेतकरी कुटुंबातील सैनिक सचिन यांनी जिद्दीच्या जोरावर कष्ट करून भारतीय सैन्य दलात प्रामाणिक काम करून नाव मिळवले. आपला सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची … Read more

पुणे | गुढ्या उभारून, शोभायात्रेद्वारे नववर्षाचे स्वागत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरोघरी गुढी उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी लिंबाचा पाला, आंब्याचे ढहाळे, साखरेची गाठी, फुलांच्या हाराने सजलेली गुढी उभारण्यात आली. याशिवाय अनेक संघटनांनी, राजकीय पक्षांनी चौकांमध्ये, समाजमंदिरात सार्वजनिक … Read more

पिंपरी | शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, समाजप्रबोधनपर जिवंत देखावे

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव सार्वजनिक गणेश मंडळाकडून शिवप्रतिमांची पूजा करून तर श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीकडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीतर्फे श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन … Read more

पिंपरी | चैत्र पाडव्यानिमित्त निगडी परिसरात शोभायात्रा

पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती मंच यमुनानगर यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त येत्या ९ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे २४ वे वर्ष आहे. या वेळी सकाळी ७ वाजता गुढीची व ग्रंथदिंडीची पूजा करून शोभायात्रेची सुरुवात श्री अष्टविनायक मंदिर येथून होईल. शोभायात्रेची सांगता श्रीराम मंदिर, यमुनानगर येथे होईल. या वर्षी २२ जानेवारीला … Read more

पुणे जिल्हा : निमगावच्या ऋतुजा भोरडेची ग्रामस्थांकडून मिरवणूक

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी कुटुंबातील ऋतुजा भोरडे हिची नुकतीच वनविभागात वनरक्षक पदी नियुक्ती झाल्याने शक्ती महिला प्रशिक्षण केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने ऋतुजा भोरडेची मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला आहे. ऋतुजाने शेतातील कामे करत वेळप्रसंगी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करुन जिद्दीने अभ्यास मिळवलेल्या यशातून करत वनविभागात वनरक्षक पदी ऋतुजाची वर्णी लागली असताना नुकतेच शक्ती महिला प्रशिक्षण … Read more

पुणे जिल्हा | धामणीत खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक

लोणी धामणी,(प्रतिनीधी) – धामणी (ता. आंबेगांव) येथे धर्मबिजेला (रविवारी) कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची लोकवर्गणीतून नवीन करण्यात आलेल्या पितळी पालखीतून वाजतगाजत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात व फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मागील वर्षीच्या (२३ नोव्हेबर २३) सोमवतीच्या सोहळ्यात खंडोबाच्या मानाच्या काठीच्या व पालखीच्या मानकर्‍यांनी खंडोबाची नवीन पालखी करण्याची ग्रामस्थांना विंनती केलेली होती. त्यावेळी देवस्थानने व … Read more