पुणे जिल्हा : पाबळमध्ये भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक

पुणे – जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त पाबळ येथील जैन भाविकांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन स्थानिक जैन बांधव-भगिनींनी त्यांची पूजा केली.

यानंतर प.पू. सुरीश्वर विश्वकल्याण विजयजी महाराज साहेब यांनी महावीरांचे धर्मकार्य पर प्रवचन केले. यावेळी पद्ममनी जैन ट्रस्टचे पदाधिकारी,भाविक व महिला वर्ग उपस्थित होता.

#RepublicDay | दिल्ली संचलनात ब्लू मॉरमॉन फुलपाखरू अन्‌ शेकरू…

मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्‍यातील भीमाशंकर अभयारण्यातील फुलपाखरू ब्लु मॉरमॉन आणि शेकरू यांच्या प्रतिकृतींचा समावेश दिल्ली येथे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनातील चित्ररथात करण्यात आल्याची माहिती वन्य प्राणी अभ्यासक अॅड. राहुल पडवळ यांनी दिली. “महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित होणाऱ्या संचलनातील चित्ररथात भीमाशंकरच्या संरक्षित अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या राज्य फुलपाखरू ब्लु मॉरमॉन या प्रजातीच्या फुलपाखराची … Read more

प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. येथील कँटॉन्मेंट परिसरातील … Read more

सोमेश्वराची श्रावणी सोमवार यात्रा नाही

कळस दर्शन घेऊन केले समाधान व्यक्त सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध प्रती सोरटी सोमनाथाचे रूप मानले जाणारे सोमेश्वराची श्रावण सोमवार यात्रा यात्रा विधिवत व मोजक्या लोकांच्या संपन्न झाली. श्रावण महिन्यातील हा १७ऑगस्ट रोजी असणारा शेवटचा सोमवार असून या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांची ची लाखोंच्या संख्येत गर्दी होत असते, मिठाईवाले पाळणे घरगुती गृह उपयोगी … Read more

भुलेश्‍वराच्या गाभाऱ्यात फुले, मिठाईची सजावट

दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रातिनिधीक यात्रा साधेपणाने भुलेश्‍वर(प्रतिनिधी ) – माळशिरस (ता. पुरंदर) येथील भुलेश्‍वर महादेवाची श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारची प्रातिनिधीक यात्रा शांततेत पार पडली. यावेळी गाभाऱ्यामध्ये विविध प्रकारची फुले व मिठाईचा वापर करून आकर्षक सजावट तर गाभाऱ्या समोर मंडपात फुलांचा आकर्षक गालीचा तयार करण्यात आला होता. दरवर्षी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी भक्‍तांची रांग लागलेली … Read more

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर ; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळीच या लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य … Read more

शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचे, हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोल्हापूर : राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज तालुक्यात देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. उद्या १९ फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज तसेच कागल येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. गडहिंग्लज येथील श्री. शिवाजी … Read more