पुणे जिल्हा : बिबट्या नसबंदी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

जुन्नर वनविभागाकडून पाठपुरावा सुरू – उपवनसंरक्षक सातपुते जुन्नर – जुन्नर वन विभागात मानव बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांच्या गंभीर घटना वाढत आहेत. बिबट्यांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन बिबट नसबंदी करण्यात यावी, असा देशातील पहिला प्रस्ताव जुन्नर वन विभागाकडून जानेवारी2024 मध्ये केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याच्या मंजुरी करिता पाठपुरावा सुरू असल्याचे जुन्नरचे … Read more

पुणे जिल्हा : नुकसान भरपाईसाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील : आंबेगावातील शेतीवर जाऊन केली पाहणी मंचर – राज्यात गारपीटी व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (दि. 27) सांगितले. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, कोल्हारवाडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना वळसे पाटील बोलत होते. यावेळी … Read more

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील

मुंबई : ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारे महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि व्यवसाय करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा लाभ होईल. तसेच रोजगारासाठी लागणारे कला व कौशल्याचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक केंद्र सुरु करण्यात येईल. लर्निंग मॅनेजमेंट … Read more

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव … Read more

सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करा – मंत्री वडेट्टीवार

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत मंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इतर … Read more

पुणे : ठराव, प्रस्ताव संकेतस्थळावर जाहीर केले जाणार

पुणे- जिल्हा परिषदेवर “प्रशासक’ कारभार सुरू झाला असून, ही कामे नियोजनबद्ध आणि तत्काळ मार्गी लावण्यासाठी समित्यांची स्थापना केली. त्यामुळे प्रशासकांसमोर येणारे विषय आणि प्रस्तावित ठराव हे संबंधित सल्लागार समितीच्या बैठकीच्या तारखेच्या किमान तीन दिवस आधी करावेत, असे निर्देश प्रशासकांनी दिले आहेत. हे प्रस्तावित ठराव लोकांच्या अभिप्रायासाठी संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत. विषय समित्यांना पर्याय म्हणून … Read more

पाकचा पुन्हा बीसीसीआयला प्रस्ताव

कराची – ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसह चौरंगी क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पुन्हा एकदा बीसीसीआयला दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच प्रस्ताव पाकिस्तान मंडळाने दिला होता मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तो फेटाळला होता. आता लवकरच आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आशीयाई क्रिकेट समितीची बैठक होणार असून त्यात पुन्हा एकदा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे, … Read more

पुणे : दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आज ‘स्थायी’त येणार मंजुरीसाठी

पुणे –शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्या आणि निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरूवात झाली. आता त्यावर हरकती-सूचना होती, आरक्षणे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल आणि त्याक्षणी आचारसंहिताही लागू होईल.या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून … Read more

महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

मुंबई – कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाइन सुरू असून लवकरच ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर सामंत यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यात … Read more

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करा – राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता.शेवगाव) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अस्थींचे बोधेगाव (ता. शेवगाव) येथे विसर्जन करण्यात आले असल्याने त्या ठिकाणी ‘साहित्यरत्न भूमी’ नावाने … Read more