घराची मुदतपूर्व मालकी प्रदान करत मॅजेस्टिक लँडमार्क’ने दिला घर खरेदीदारांना सुखद अनुभव

वाघोली येथील मॅजेस्टिक मॅनहॅटन प्रकल्पातील घरांचे मुदतीच्या १५ महिन्यांपूर्वीच हस्तांतरण पुणे : आपल्या बांधकाम दर्जा आणि उत्तम सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील मॅजेस्टिक लँडमार्क या बांधकाम व्यावसायिक कंपनीने नुकतेच घर खरेदीदारांना सुखद अनुभव दिला आहे. कंपनीने शनिवारी ( दि.११) वाघोली येथील मॅजेस्टिक मॅनहॅटन या प्रकल्पातील २ ऱ्या फेज मधील घरांचे मुदतीच्या तब्बल १५ महिन्यांपूर्वीच हस्तांतरण केले. … Read more

लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी … Read more

आम्हीही तुमच्या पाठीशी! गुगलकडून भारताला १३५ कोटींची मदत करण्याची घोषणा

नवी दिल्ली : भारतामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुले भारताची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून भारताची मदत करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत.काही देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची … Read more

केअर टेकर कसले? त्यांनीच ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले साडेअकरा लाखांना …वाचा थरारक घटना

पुणे  – ज्येष्ठ दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून घरातील साडे अकरालाखांचा ऐवज लुटण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिला जखमी झाली. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. गुन्ह्याचा छडा लावत कोथरुड पोलिसांनी 24 तासांत आरोपींना जेरबंद केले. केअर टेकर पुरवणाऱ्या एजन्सीचा मालक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे कृत्य केले होते.     आकाश कांबळे (22, रा. निगडी), दीपक सुगावे (21, … Read more

सिद्धी विनायक मंदिराकडून सरकारला आर्थिक मदत देण्यावर स्थगिती नाही

मुंबई – करोनाचा मुकाबला करण्यासाठी सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट तर्फे राज्य सरकारला आर्थिक निधी देण्याच्या निर्णयावर कोणतीही स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तथापि या निधीत कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास हा निधी मंदिराला परत करण्याचा आदेश आम्ही देऊ असेही कोर्टाने बजावले आहे. सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट तर्फे शिवभोजन योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी … Read more

धान्याचा पुरवठा करणाऱ्या कामगारांना देखील विम्याचे कवच

मुंबई : डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच दिल्यानंतर आता  लॉकडाऊनच्या काळात धान्याचा पुरवठा करणाऱ्या कामगारांना देखील विम्याचे कवच देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काळात देशभरात धान्य पुरवठा करण्यासाठी काम करणार्‍या 80,000 कामगारांसह भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) 1,08,714 कामगार आणि अधिकारी यांना जीवन विमा संरक्षण देण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय … Read more