लोकांसाठी उपलब्ध माणूस हीच माझी गॅरंटी ; शिवाजीराव आढळराव यांची ग्वाही

मोशी, शिवाजीवाडी, ऑस्टीया सिटीत मतदारांच्या गाठीभेटी मोशी – महायुतीचे सर्वाच्च नेते नरेंद्र मोदी मतदारांना गॅरंटी देत आहेत. तशी तुमची मतदारांसाठी कोणती गॅरंटी या प्रश्नावर मी लोकांसाठी उपलब्ध असणारा माणूस हीच माझी गॅरंटी असल्याचे महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव यांनी मोशी दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या प्रचारार्थ मोशी, शिवाजीवाडी, भारतमाता चौक, ऑस्टीया सिटी या भागाचा दौरा … Read more

मतदानासाठी लाच घेतल्यास लोकप्रतिनिधींवर फौजदारी खटला; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली  – मतदान करण्यासाठी किंवा सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांवर आता कारवाईचा बडगा उगारता येईल. यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने 1998चा निर्णय रद्दबादल ठरविला आहे. तसेच नरसिंह रावांच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा अर्थ कलम 105/194 च्या विरोधात आहे. लाचखोरीला संसदीय विशेषाधिकारांचे संरक्षण नाही, असेही निकालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे, देशात निवडणुकीचे वातावरण … Read more

राजस्थानात जनतेशी संबंधित कोणतीही योजना बंद करणार नाही; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची महत्वाची घोषणा

जयपूर – राजस्थानात सत्ताबदल झाला आहे. आता सुशासन आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात जनतेशी निगडीत असलेली एकही योजना बंद केली जाणार नाही तर उलट जनतेच्या हिताच्या असलेल्या योजनांचा विस्तार केला जाईल अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केली आहे. सरकार भाजपने दिलेल्या घोषणापत्रातील सगळी आश्‍वासने पूर्ण करेल तसेच पहिल्या शंभर दिवसांत पूर्ण … Read more

सुविधांचे फक्‍त राजकारण! भाजीमंडई, व्यायामशाळा, जलतरण तलाव धूळखात; नागरिकांना शून्य सुविधा

महादेव जाधव कोंढवा – कोंढवा बुद्रुक येथील प्रभाग क्र.41 मध्ये विविध प्रकल्पांच्या इमारतींची उद्‌घाटने झाली आहेत. पण, 3-4 वर्षे होऊनही या सुविधा नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाने जनतेच्या भावनांशी खेळ न करता, ही विकासकामे व प्रकल्प तातडीने सुरू करावीत अशी संतप्त भावना नागरिक व्यक्‍त करत आहेत. 1. भाजीमंडईची इमारत – भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी हक्काची जागा … Read more

महत्वाची बातमी! जनतेतून महापौर ते सुध्दा पाच वर्षांसाठी…

पुणे : भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी राज्यातील महानगरपालिकेचे महापौर थेट जनतेमधून निवड करावी आणि ही निवड पाच वर्षांसाठी करावी, अशी शिफारस राज्य शासनास केली आहे. या शिफारशींच्या अनुषंगाने उचित निर्णय घेण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले. राज्यातील महानगरपालिकेचा महापौर थेट जनतेमधून निवडून आणि आवश्‍यक कार्यकारी अधिकार … Read more

“विश्‍वासघातकी कोण हे जनता ठरवेल” CM शिंदे यांचा घणाघात

  सासवड, दि. 2 (प्रतिनिधी) – एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्‍का लावला जाणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते, ते आम्ही केले. मग विश्‍वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे जनता ठरवेल. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही पायउतार झालो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम … Read more

जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. कोरोना काळात राज्यातील गरजू लोकांना अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले … Read more

दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे

मुंबई :- एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. मंत्री … Read more

“भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”; भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गावभर फिरत मागितली गावकऱ्यांची माफी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात राजकारण सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तृणमूलला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणारे अनेकजण आता घरवापसी करत आहेत. त्यातच आतापश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान तृणमूल काँग्रेस … Read more

#Corona | होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- 19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.  कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक … Read more