“पुद्दुचेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ” या बड्या नेत्याने केली घोषणा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास पुद्दुचेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल अशी ग्वाही द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिली आहे. पुद्दुचेरी येथील काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार व्ही वैथिलिंगम यांना पाठिंबा देण्यासाठी येथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की पुद्दुचेरीला पूर्ण राज्य बनवायला हवे यावर द्रमुक … Read more

Breaking News : भाजपची लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर; ‘या’ 15 जणांचा समावेश, कुणाला दिला डच्चू? पाहा….

modi shah

BJP 4th list | Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने काल गुरुवारी (दि. 21) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये एकूण नऊ उमेदवार असून सर्व तमिळनाडू राज्यातील आहेत. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चेन्नई साऊथमधून टी सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून विनोज … Read more

तामीळनाडूत कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा; पुदुचेरीतील एकमेव जागाही लढवणार

चेन्नई  -कॉंग्रेस आणि द्रमुक या मित्रपक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या जुन्याच फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, तामीळनाडूत कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा आल्या आहेत. त्याशिवाय, पुदुचेरीतील एकमेव जागाही कॉंग्रेस लढवणार आहे. कॉंग्रेस आणि द्रमुक हे इंडिया या देशव्यापी आघाडीतील घटक आहेत. तामीळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्या राज्यातील मोठा पक्ष असल्याने जागावाटपाची सुत्रे द्रमुकच्या हाती होती. त्या … Read more

Cotton Candy । सावधान..! तुम्हीही ‘कॉटन कॅंडी’ खाताय मग ही बातमी एकदा वाचाच..

Cotton Candy Banned

Cotton Candy ।  तुम्हीही तुमच्या मुलांसाठी जत्रेत किंवा बाजारात ‘कॉटन कॅंडी” विकत घेत असाल तर सावधान.. लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या या गोड ‘कॉटन कॅंडी’मध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन आढळले आहे. साखरेपासून तयार होणाऱ्या या गोड पदार्थाला  भारतात भरपूर प्रमाणात खाल्या जाते. याच  ‘कॉटन कॅंडी’ची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी रसायन … Read more

तामिळनाडू-पुद्दुचेरी आयटीची कारवाई; 60 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याची नाणी जप्त

IT Raid – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील दोन व्यावसायिक समूहांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीबीडीटीने बुधवारी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी दोन व्यावसायिक समूहांशी संबंधित सुमारे 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या शोध मोहिमेनंतर विभागाने 32 कोटी रुपयांची रोकड आणि 28 कोटी रुपयांची सोन्याची नाणी जप्त केली … Read more

स्कूटरवरून फटाके घेऊन घरी जाताना भीषण ‘स्फोट’; पिता-पुत्राचा मृत्यू

पुद्दुचेरी – स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना स्फोट होऊन या घटनेत वडिल आणि मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुद्दुचेरीमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरी येथील रहिवासी कालाई अरसन त्यांच्या 7 वर्षीय मुलगा प्रदीपसोबत फटाके घेऊन स्कूटरवरून घरी परतत होते. त्याचवेळी अचानक फटाक्यांमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की त्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला. तसेच रस्त्यावरून … Read more

पद्दुचेरीत मंत्रिमंडळाचा विस्तार; पाच मंत्र्यांनी घेतली शपथ

पदुचेरी – पद्दुचेरीत सत्तेवर आलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, आज या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील दोन जण भारतीय जनता पक्षाचे आहेत. मंत्रिमंडळ रचनेविषयी एनआर कॉंग्रेस व भाजपमध्ये प्रदीर्घ काळ चर्चा सुरू होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मागच्या आठवड्यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित करण्यात आला. यानिमित्त या प्रांतात भारतीय जनता पक्ष प्रथमच … Read more

पुदुच्चेरीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू, प्रकृती स्थिर

चेन्नई: देशभरात नुकत्याच पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जनतेने कौल दिला. त्यानंतर एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत म्हणजेच दोन दिवसात एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रंगास्वामी यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती … Read more

पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून रंगासामींनी घेतली शपथ; भाजपला मिळणार उपमुख्यमंत्रिपद

पुदुच्चेरी  -केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून एआयएनआरसी या पक्षाचे नेते एन.रंगासामी यांनी शुक्रवारी शपथ घेतली. ते चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. दरम्यान, प्रथमच पुदुच्चेरीमधील सरकारचा घटक बनलेल्या भाजपला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एआयएनआरसी-भाजप युतीने बाजी मारली. विधानसभेच्या एकूण 30 पैकी 16 जागा त्या युतीने पटकावल्या. आता मुख्यमंत्री वगळता दोन्ही पक्षांच्या वाट्याला तीन-तीन … Read more

चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा धुरळा; मोदींचं चार भाषांमध्ये ट्विट

नवी दिल्ली : देशातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचे भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. तामिळनाडूत २३४ विधानसभा … Read more