Pune: अनेक वर्षांनंतर रात्रीच्या वेळी हडपसरच्या मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आमदार चेतन तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खासगी बसेसची होणारी पार्किंग आणि खासगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबे आता शेवाळेवाडी (मांजरी बुद्रुक) येथे पीएमपीएमएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. याबाबत नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. आमदार चेतन तुपे यांनी  रविवारी(दि. ९) रोजी स्वतः … Read more

Pune: गणेशोत्सवात जटोली शिवमंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. या मंदिराची प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. सणस मैदानासमोरील … Read more

‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांकडून ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोहोळ हे रविवारी होणाऱ्या … Read more

इयत्ता अकरावी प्रवेश: ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवले पसंतीक्रम

पुणे – पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीत “कॅप’अंतर्गत पाच दिवसांत ४२ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीला ५ जूनपासून सुरुवात झाली आहे. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ८३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामधील ७६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरून ते … Read more

Pune: मनपाच्या दुर्लक्षामुळेच पुण्याची दुरवस्था – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे– शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला असताना, पुणेकरांना आपत्कालिन सेवा देण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे ही दुरवस्था पुणे शहरावर ओढवली आहे, असा आरोप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच नागरिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पावसाळ्यासाठीची आवश्यक कामे करण्याच्याही सूचना … Read more

कोल्हापूर, सिंधूदुर्गमध्ये अतिवृष्टी, तर पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी (दि. 9) मुंबईत दाखल झाले असून, त्याने अरबी समुद्राचा उर्वरीत भाग, उत्तर अरबी समुद्राचा काही भाग आणि महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे. दरम्यान, पुढील 48 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि … Read more

Pune: धरणसाखळी परिसरात मान्सूनची सलामी

पुणे – जिल्हा आणि शहरात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या परिसरात दमदार सलामी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा खडकवासला धरण क्षेत्रात झाला आहे. पुण्यात मान्सूनचे आगमन झाले असून, आता धरणांच्या परिसरात पाऊस सुरू झाला आहे. मागील वर्षी अपुरा पाऊस त्यामुळे धरणे जेमतेम भरली. मात्र धरणातून विसर्ग करण्यात आला नव्हता. तसेच परतीच्या … Read more

Pune: कात्रज-कोंढवा मार्गाचे काम संथ, असुरक्षित

कोंढवा – कात्रज – कोंढवा मार्गाचे काम सध्या अतिशय संथ आणि असुरक्षित सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे. जागोजागी खोदकाम सुरू आहे. शनिवारी येथे खड्ड्यात चार मुली पडल्या. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आणखी तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा पश्चिम महाराष्ट्र … Read more

Pune : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेताच शहर भाजपने एकच जल्लोष केला. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी रविवारी सकाळी पुणेकरांना मिळाली. त्यानंतर दिवसभर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या शपथविधी … Read more

Pune : आपत्कालिन स्थिती पुन्हा होणार नाही; शहर पाण्यात गेल्यानंतर महापालिका प्रशासनाचा दावा

पुणे -शहर- उपनगरांत शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आपत्कालिन स्थिती निर्माण झाली होती. त्यावर मनपा प्रशासनावर चारही बाजूंनी टीकेचा भडिमार झाला. त्यावर शनिवारसारखी स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ढगफुटीसदृश स्थिती संपूर्ण शहरात निर्माण झाली होती. ठिकठिकाणी वाड्यावस्त्यांमध्ये पाणी शिरले होतेच, शिवाय रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचले होते. पावसाळी जाळ्यांमध्ये … Read more