पुणे | सनद, कागदपत्रे तपासणीस ३० जूनपर्यंत वाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे बार असोसिएशन निवडणुकांवेळी मतदार यादीबाबत घोळ होतात. ते टाळण्यासाठी, प्रॅक्टिस करत असलेले, नसलेले वकील शोधणे आवश्यक आहे. तसेच वकिलांच्या हितासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व वकिलांची सनद आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. वकिलांच्या नावांची सुधारित यादी तयार करत त्यांची नोंदणी करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि गोवा … Read more

पुणे | पुणे बार असोसिएशनसाठी निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतपत्रिका मिळण्यास विलंब, वकिलांमधील वादावादी, मतदानावेळी हुल्लडबाजी अशा अभूतपूर्व गोंधळात वकिलांची शिखर संघटना पुणे बार असोसिएशन निवडणुकीतील मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २१) पार पडली. असोसिएशनच्या ७ हजार ९२३ सभासदांपैकी ३ हजार ९४७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीतील त्रृटींमुळे मतदान दोनदा पुढे ढकलल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदारांचा उत्साह कमी राहिल्याचे चित्र … Read more

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) निवडणुकीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळाबाबत विद्यमान अध्यक्ष, मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्तांसह इतरांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणूक पुढे ढकलण्याची नामुष्की असोसिएशनवर ओढवली आहे. निवडणुकीला काही तास उरले असताना हा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व … Read more

PUNE: निवडणूक लांबली, उमेदवारांचा प्रचाराला ब्रेक

पुणे – पुणे बार असोसिएशनच्या निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचा समर्थकांकडून जोमाने सुरू असलेल्या प्रचाराला ब्रेक बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह असोसिएशनने केलेल्या नियोजनशून्य कारभारामुळे वेळेसह पैशांचाही अपव्यय होत आहे. मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे उमेदवारांकडून खासगीमध्ये सांगण्यात येत आहे. पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी … Read more

पुणे बार असोसिएशन निवडणूक प्रक्रिया; प्रमुख निवडणूक आयुक्तपदी एन. डी. पाटील यांची नियुक्ती

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील एन. डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. केतन कोठावळे व मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड. दादाभाऊ शेटे यांनी दिले. पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक ३१ … Read more

PUNE: भेटवस्तू नाकारत मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठीची मतदान ३१ जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्याअनुषंगाने उमेद्वारांकडून भेटवस्तूसह विविध गोष्टींचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित होण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. लोकशाहीला अनुरूप आणि पारदर्शी निवडणूका पार पडण्यासाठी वकीलवर्गाने भेटवस्तू नाकारत मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. जयश्री चौधरी-बिडकर यांनी … Read more

PUNE: आगामी निडणुकांबाबत एकमताने ठराव; पुणे बार असोसिएशनच्या सभेत वकिलांकडून विविध मागण्या

पुणे – पुणे बार असोसिएशनच्या आगामी निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करावा, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर देखरेखीसाठी सात सदस्यीय समिती नेमावी यासह विविध विषयांवर सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करण्यात आला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वकिलांची सर्वसाधारण सभा न्यायालयातील हिरवळीवर दुपारी एक वाजता पार पडली. दरम्यान, वार्षिक सदस्यत्व नोंदणी बंद करून कायमस्वरुपी सदस्यत्व असावे, अशी मागणीही वकील वर्गाकडून करण्यात आली. त्याबाबत … Read more

pune news : पुणे बार असोसिएशनच्या निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट; अध्यक्ष पदासाठी दुहेरी लढत

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठी दुहेरी निवडणूक होत आहे. अ‍ॅड. अमित गिरमे आणि अ‍ॅड. संतोष खामकर यांच्यात ही निवडणूक होणार आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी मोठी चुरस आहे. तब्बल सात जण नशिब अजमावत आहेत. त्यामध्ये अ‍ॅड. समीर भुंडे, अ‍ॅड. शिरीषकुमार देशमुख, अ‍ॅड. … Read more

PUNE: आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचे न्यायालयात गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

पुणे – न्यायालयात चारही बाजूंनी काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे कॅन्टीन पाडल्याने वकील, पक्षकार यांना दुपारच्या वेळेत बसून जेवण करण्यासाठी हक्काची जागाच राहिलेली नाही. नवीन इमारतीशेजारील कॅन्टीनला पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने सर्वांचीच गैरसोय झाली आहे. न्यायालयीन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आणि उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीच दाखल घेतली न गेल्याने अखेर वकिलांनी गांधीगिरी … Read more

PUNE: पुणे बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन 202४-2५ ची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी होणार आहे. शिवाजीनगर न्यायालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५.०० या वेळेत मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी करून रात्री निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जाच्या फॉर्मची विक्री आणि स्वीकृती १० जानेवारीपर्यंत सकाळी … Read more