pune news : बाह्यवळण मार्गावर तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

pune news : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून (murder) करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे (crime) निश्चित कारण समजू शकले नाही. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रुपेश (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

pune news : बाणेर रस्त्यावर महाबळेश्वर हॉटेलजवळ गोळीबार; तरुण गंभीर जखमी

pune news : कामावरुन काढून टाकल्याने दोघांनी तरुणावर गोळीबार केल्यची घटना बाणेर रस्त्यावर महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली … Read more

Lalit Patil News : ललितची ससूनमध्ये मैत्रिणीने भेट घेतल्याचे निष्पन्न; दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक

पुणे –  ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. त्या दोघी ललित पाटीलच्या (Lalit Patil) संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान दोघींना न्यायालयाने 23 ऑक्‍टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. . ऍड.प्रज्ञा कांबळे(39, दत्त मंदिर चौक, नाशिक) आणि अर्चना निकम(33, रा.समर्थनगर, नाशिक) … Read more

Pune Crime News : पिस्तूलसह पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या तरुणास अटक   

पुणे :- भारती विद्यापीठ पोलिसांनी भिलारेवाडी येथे पेट्रोल पंपाजवळ पिस्तूल घेऊन थांबलेल्या तरुणास अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. आरोपी मुळचा मध्य प्रदेशातील असून तो शिरवळ येथे एका खासगी कंपनीत काम करतो. सतिश गुलाबराव शेरके (23, रा. सध्या शिंदेवाडी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळ जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे … Read more

Pune News : मालमत्तेच्या वादातून करणी केल्याप्रकरणी मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा

पुणे – मालमत्तेच्या वादातून आईची साडी चोरुन नेऊन त्याला अंडी, टाचणे लावून, करणी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी मांत्रिकासह सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जनवाडीत राहणाऱ्या एका 28 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांता सुरेश चव्हाण … Read more

Crime : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री; दलालांविरुद्ध गुन्हा दाखल…

पुणे : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांसह चौघींना डांबून ठेवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आखाती देशात सफाई काम करणाऱ्या महिलांची दलालांनी चार लाख रुपयांत विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दलाल नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान, हकीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

Pune Crime News : सराईत गुन्हेगार देशी पिस्तूलासह जेरबंद

पुणे :- अवैधरित्या जवळ पिस्तूल बाळगणार्‍या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी लक्ष्मीनगर भागातून अटक केली. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. साहिल हनिफ पटेल (२१, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पटेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पर्वती पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान शाहु वसाहत, लक्ष्मीनगर … Read more

Pune Crime : चार महिण्यापासून फरार असलेला गुन्हेगार अखेर जेरबंद

पुणे – मोक्काच्या गुन्हयात मागील चार महिण्यापासून फरार असलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा आणि दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल आहे. आलोक उर्फ आल्या अर्जुन जाधव (19, रा. मंगळवारपेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 11/4/2023 रोजी पांडवनगर भागात दहशत माजवीण्याचे उद्देशाने अजय विटकर, … Read more

Pune News : पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यास महिनाभर विलंब; खून प्रकरणात जामीन…

पुणे – पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यास झालेला महिनाभर विलंब, साक्षीदाराची ओळख परेड न घेणे महागात पडले आहे. वाघोली येथील खून प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. सागर मोहिते असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अजित पवार आणि ऍड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. वाघोली बाजारा … Read more

कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाख रुपयांचं बक्षीस !

पुणे – शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे, हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पुण्यातील सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली आहे. या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील … Read more