Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

Crime News : तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रणव सुर्वे ( २१, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगी दहावीत … Read more

pune gramin : खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदार आक्रमक

प्रतिनिधी – रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर –  खेड तालुक्यातील २५ पैकी १९ ग्रामपंचायती साठी मतदान सुरू असून दुपार नंतर तिन्हेवाडी व सातकरस्थळ ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू असल्याने मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत तर वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदार आक्रमक झाले आहेत. खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून २५ … Read more

…त्या पोलिसांच्या चौकशीचे पोलीस उपायुक्तांचे आदेश; डीसीपी ॲक्शन मोडवर

वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व तीन कर्मचारी यांच्या विरोधात एका नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून या प्रकरणाची दखल सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी घेतली असून लोणीकंद पोलीस ठाण्यातील त्या चार पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील … Read more

SSC Result 2023 : मुळशी तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.९९ टक्के; वाचा सविस्तर….

पिरंगुट (वार्ताहर) – मुळशी तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.९९ टक्के लागला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची असलेली प्रतिक्षा अखेर संपली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात घट झाली असून ०.२३ टक्के निकाल कमी लागला आहे. तर तालुक्यातील २६ शाळांचे निकाल हे शंभर टक्के लागले आहेत. गतवर्षी ३६ शाळा शंभर नंबरी ठरल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व … Read more

pune gramin : पोखरी प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा खंडित

मंचर  – आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सात गावांमध्ये राबविण्यात आलेल्या पोखरी प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. “धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशी परिस्थिती धरणाजवळील या गावांची झाली आहे. पोखरी प्रादेशिक योजना ही 1998 मध्ये त्यावेळच्या लोकसंख्येनुसार केली … Read more

pune gramin : वेताळेत धावले 180 बैलगाडे

राजगुरूनगर -गाव वेताळे (ता. खेड) येथील सिद्धेश्‍वर महारांजाच्या यात्रेनिमित्ताने शर्यतीत 180 बैलगाडा धावले. यात घाटाचा राजाचा मान सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांनी पटकावला. दरम्यान, मुलांप्रमाणे मुलींच्या कुस्ती स्पर्धेने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बैलगाडा शर्यातीत फायनलसाठी 11.20 सेकंदात वाडा गावचे नीलेश घनवट यांच्या बैलगाड्यांनी बाजी मारत मोटारसायकल जिंकली. 11.61 सेकंदात राजगुरूनगरच्या स्व. सचिन सूर्यकांत भंडलकर … Read more

pune gramin : कृषीपंपाना दिवसा वीज द्यावी – वळसे पाटील

मंचर  -विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या पाच जिल्ह्यांना ऊर्जा विभागाच्या 30 नोव्हेंबर 2022 च्या पत्रांमुळे कृषी पंपासाठी दिवसा वीज देण्याचा निर्देश शासनाने दिलेला आहे. त्याच धर्तीवर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी रात्रीऐवजी दिवसा अखंडित थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी विधानसभेत दिलीप वळसे … Read more

pune gramin : जेजुरीमध्ये दहशतीचे वातावरण

जेजुरी -जेजुरी शहरात शुक्रवारी (दि. 24) सायंकाळच्या सुमारास दोन गटांतील धुमश्‍चक्रीमध्ये कोयता-तलवारी, दगडांचा वापर झाला होता. या घटनेच्या वेळी परिसरातील दुकाने बंद झाली होती. दरम्यान, या घटनेमुळे अद्यापही सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने शहरात कायदा व सुवस्था आबाधित राखण्याचे आव्हान जेजुरी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. जेजुरी नगरपालिकेसमोर कोयता व तलवारीने वार करून पाच जणांना गंभीर … Read more

pune gramin : व्यसन ही फक्‍त सवय नव्हे, तर मेंदूचा एक आजार

लोणी काळभोर  -व्यसन ही फक्त सवय नाही तर हा मेंदूचा एक आजार आहे. कोविडच्या साथीनंतर व्यसनांमध्ये मोठी वाढ झाली असून यामध्ये ड्रग्ज (अंमली पदार्थ) आणि वर्तणुकीशी संबंधित व्यसने या दोन्हींचा समावेश आहे. परंतु या जुनाट आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सामान्य जनता, प्राथमिक काळजी घेणारे डॉक्‍टर किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यापैकी कोणीही जागरूक नाहीत किंवा प्रशिक्षित … Read more