Pune district court : वीजेअभावी ‘शिवाजीनगर न्यायालया’चे कामकाज तासभर थांबते तेव्हा…

पुणे – मुसळधार पाऊस, त्यातच वीजेची बत्ती गुल झाल्याचा परिणाम शुक्रवारी (दि 30) तासभर शिवाजीनगर न्यायालयाच्या कामकाजावर झाला. कामकाज सुरू असणाऱ्या संगणकांना बॅकअप नसल्यामुळे, त्यातच त्या संगणकामध्ये महत्त्वपूर्ण पुरावे असल्यामुळे कामगाज थांबविण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. दरम्यान. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटून गेली. तरी नागरिकांना न्याय देणाऱ्या न्यायालयात अद्याप पायाभुत सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. … Read more

सोमवारपासून पुणे जिल्हा न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून ओसरला असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एम.डब्ल्यू चंदवाणी यांनी राज्यातील प्रमुख जिल्हा न्यायाधिशांना दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा न्यायालय सोमवारपासून (दि. 14) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख … Read more

जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाला मिळणार बुस्टर

  पुणे – मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थित आणि तत्काळ प्रकरणांपुरते सुरू असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाला आता बुस्टर मिळणार आहे. येत्या सोमवारपासून (दि. 14) जिल्हा न्यायालयातील सर्व कोर्ट हॉल (न्यायालये) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व न्यायाधीशांनी न्यायालयात येऊन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घ्यावी, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने गुरुवारी काढले.   करोनामुळे मागील साडेपाच महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज रेंगाळले … Read more

बलात्कार प्रकरणांत पुणे जिल्ह्यात निवाडे होणार जलदगतीने

पुणे – बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) प्रलंबित खटले जलद निकाली लावण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचार व बलात्कार पीडितांना लवकर न्याय मिळण्यास मदत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 च्या एका जनहित याचिकेमधील आदेशानुसार पोक्सो कायद्यांतर्गत 100 पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांचा ठिकाणी विशेष … Read more

लाच घेणाऱ्या महिला सरपंचास एक वर्षे सक्त मजुरी

राजगुरूनगर: कुरण ता जुन्नर येथील अंगणवाडी इमारतीच्या बांधकाम व्यवसायिकाकडून सात हजाराची लाच घेणाऱ्या महिला सरपंचाला एक वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षासुनावण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सहाय्यक जिल्हा न्यायाधीश एस एन पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. रंजना दत्तात्रय कोकणे ( वय ४५,रा कुरण, ता जुन्नर) असे … Read more