पुणे | पुण्यात मतटक्का वाढला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 61 हजार 276 मतदारांपैकी 11 लाख 3 हजार 678 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सरासरी 53.54 टक्के मतदान झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानामध्ये 3.4 टक्के म्हणजे जवळपास 69 हजार 524 मतदान वाढले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, … Read more

पुणे | शिरूरच्या ईव्हीएम स्ट्राॅंग रूममध्ये

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्र कोरेगाव पार्क धान्य गोदाम ठेवण्यात आले आहेत. तर शिरुर मतदारसंघातील ईव्हीएम रांजणगाव एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी स्ट्राॅंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणी दि.4 जून 2024 रोजी होणार आहे. त्यामुळे ईव्हीएम सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही … Read more

पुणे | पर्वती विधानसभा क्षेत्रात मतदानाचा उत्साह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभेतील पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्‍य पार पडण्यासाठी मतदारांचा उत्‍साह दिसून आला. दुपारची वेळ वगळता पर्वती मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानासाठी रांगा रांगल्‍या होत्‍या. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍याचे चित्र दिसून आले. पर्वती मतदारसंघात सहकारनगर, पर्वती, पर्वती दर्शन, जनता वसाहत, पु.ल.देशपांडे उद्यानाचा काही भाग, महर्षीनगर, गुलटेकडी, … Read more

पुणे | कॅन्टोमेंटचा टक्का दुपारनंतर वाढला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदार संघासाठी कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघात मतदारांचे नाव यादीत नसल्याने गोंधळ झाल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. याचा राग प्रशासनावर काढण्यात येत होता. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत सहाही विधानसभा मतदार संघांपैकी कॅन्टोमेंटमधील टक्केवारी सर्वाधिक कमी राहिली. कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत १३. ९४ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी … Read more

पुणे | मतदारांचा कौल ईव्हीएम’मध्ये बंद

पुणे, – {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ या तिनही लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात सरासरी 45 टक्के मतदान झाले. शिरुर लोकसभा मतदारसंघात सरासरी 44 तर मावळ मतदारसंघात सरासरी 46.03 टक्के मतदान झाले. पुणे लोकसभा मततदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या … Read more

पुणे | गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथकांचा मोहोळ यांना पाठिंबा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे, त्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नासमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासनदरबारी जातील आणि ते सुटतील अशी भावना मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीमंत भाऊसाहेब … Read more

पुणे | मराठा महासंघ मोहोळांच्या पाठीशी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, शहराध्यक्ष वैभव शिळमकर, सरचिटणीस मयूर गुजर, महिला प्रमुख आरती मारणे, जयश्री साळुंके, सविता मारणे यांची प्रमुख या वेळी उपस्थिती … Read more

पुणे | पुण्याच्या विकासाला ब्रेक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या १० वर्षांत पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. १०० नगरसेवक, शहरातील सहाही आमदार आणि १ खासदार याबरोबरच केंद्रात व राज्यात सत्ता एवढे असूनही पुण्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी केंद्र व राज्य सरकारकडून शहराला मिळाला नसल्याची टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. धंगेकरांच्या प्रचारार्थ कसबा विधानसभा … Read more

पुणे | चांदणी चौक उड्डाणपूल ठरेल पथदर्शी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाचे प्रवेशद्वार आणि शहराच्या हद्दीलगत जाणाऱ्या पुणे- बंगळुरू आणि पुणे- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल,’ असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मोहोळ यांच्या … Read more

पुणे | ज्येष्ठ नागरिक करणार धंगेकरांचा प्रचार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काॅंग्रेस इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात आता शहरातील दोन हजार ज्येष्ठ नागरीक उतरणार आहेत. धंगेकर यांच्या प्रचारार्थ शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक घेण्यात आली. या वेळी संघटनेचे दोन हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष द. स. पोळेकर … Read more