“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” नावाचा झंझावात… एका वैचारिक चळवळीचा रौप्य महोत्सव

पुणे – लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी स्थापना दिन राज्यभरात अतिशय जल्लोषात साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा केवळ निवडणुकीची बेरीज – वजाबाकी करणारा राजकीय पक्ष नसून महाराष्ट्र धर्मासाठी लढणारी ही एक वैचारिक चळवळ आहे. राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, छत्रपती शिवाजी … Read more

Murlidhar Mohol : पहिल्याच टर्ममध्ये ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; मोदी मंत्रिमंडळात वर्णी

Narendra Modi swearing in ceremony । Murlidhar Mohol । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. ९) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला … Read more

मंत्री झाले पुणेकर..! खासदार ‘मुरलीधर मोहोळ’ केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणार

पुणे  – खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळणार असून, आजच्या (दि. 9) शपथविधी सोहळ्यात मोहोळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कोथरूड येथील मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करत आनंदोत्सव साजरा करत आहे. यावेळी ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले पुणेकर’ असा घोषणा देत जल्लोष करण्यात आला. … Read more

Pune Porsche case : मकानदारचे आमदाराशी लागेबांधे डॉ. तावरेसाठी दलाली करत असल्याचा पोलिसांना संशय

पुणे – ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा खास माणून असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. मकानदार हा संबंधित आमदार नगरसेवक असल्यापासून त्याच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होता. तो मागील पाच महिन्यांपासून डॉ. … Read more

pune news : ‘कात्रज कोंढवा रस्त्यावर खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू’; तीन मुलींना वाचविण्यात यश

कोंढवा (प्रतिनिधी) – कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात चार मुली पडल्याची घटना शनिवारी (ता. ८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गगन उन्नती सोसायटीसमोर महाकाली मंदिराजवळ असणाऱ्या १५ फूट खड्ड्यामध्ये या मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता पडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी महाकाली मंदिराजवळ काही लोक तातपूरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून राहतात. त्यामुळे … Read more

पुणे | मध्य प्रदेशातील तरुणाकडून ७ दुचाकी जप्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडक पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५, रा. स. नं. १२०, किष्किंधानगर, कोथरूड, मूळ जिल्हा- उमरीया, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरुस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये … Read more

पुणे | शैक्षणिक संस्थेच्या इमारतीला आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी शैक्षणिक संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झाेपलेल्या वसतिगृह कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली. सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची … Read more

पुणे | बारावी उत्तीर्णांसाठी कमवा आणि शिका योजना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसठी जिल्‍हा परिषदेच्‍या समाज कल्‍याण विभागातर्फे कमवा आणि शिका ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांनी दि. १५ जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्‍ह परिषदेने केले आहे. या योजनेंतर्गत झेडपीच्‍या समाजकल्याण विभागात … Read more

पुणे | कलाकारांमध्ये स्वाभिमान जरुरी; पण अहंकार नसावा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एकल सादरीकरण आणि साथसंगत करत असताना प्रत्येक वादकाची समरस भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कलाकार आपल्या कलेवर प्रेम करतच असतो. मात्र, ज्याच्यासोबत आपण वादन करीत आहोत, त्या गायकासोबत प्रामाणिकपणे एकरूप होऊन सादरीकरण करणारे वादक फार कमी असतात. कलाकारामध्ये अहम नसावा. मात्र, स्वाभिमान आणि विनम्रता असणे गरजेचे आहे, असे मत मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध … Read more

पुणे | आरटीई ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे शाळा मिळालेल्या पालकांना दि. १२ जूननंतर प्रवेशाचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. कुमठेकर रस्‍त्‍यावरील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सकाळी ११.३० वाजता इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते … Read more