पिंपरी | प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

पिंपरी (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2021-22 राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला जाहिर झाला. तर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ सारिका मोहोळ यांना जाहीर झाला आहे. महविद्यालयात रक्तदान शिबिरे, प्लास्टिक संकलन, महिला सबलीकरण ,व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती, रस्ता … Read more

पुणे | ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. पां. ह. कुलकर्णी यांचे निधन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आयुर्वेद विषयाचा १९८० च्या दशकामध्ये परदेशात परिचय करून देणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. पांडुरंग हरी ऊर्फ पां. ह. कुलकर्णी यांचे कर्करोगाने रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आयुर्वेद पदवीधर झाल्यानंतर … Read more

Pune: तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्‍क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्‍याची अंमलबजावणी यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्‍या शैक्षणिक प्रवेश विभागाने मंगळवारी काढले. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढवा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गेल्या … Read more

Pune: शिळे जेवण पुरवणाऱ्या मेस चालकाला दंड; पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीतील प्रकार

पुणे – मुंबई विद्यापीठांमधील ४० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना खराब पिठाच्या चपात्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर संतप्‍त विद्यार्थ्यांनी मेस मालकाला जाब विचारला. चपात्या आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडले आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने मेस चालकाला पाच हजार रुपये दंड केला आहे. विद्यापीठातील … Read more

पुणे | पुणे विद्यापीठात सलग 18 तास अभ्यास अभियान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाला मोठा वारसा असून, येथून खूप मोठी माणसं घडलेली आहेत, अशा या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सलग 18 तास अभ्यास करण्याचा राबविलेला उपक्रमात स्तुत्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ एक दिवस नाही, तर वर्षभर यात सातत्य ठेवावे, तसेच आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती व … Read more

पुणे | पुणे विद्यापीठातील नियुक्त्या रखडल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता या पदांसाठी मुलाखती आता जून महिन्‍यापर्यंत घेता येणार नसल्याचे स्‍पष्ट होत आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता काळात कोणत्‍याही विद्यापीठांना कोणत्‍याच पदाच्‍या मुलाखती घेता येणार नसल्‍याचे सूचित केले आहे. त्‍यामुळे आता या पदाच्‍या नियुक्‍तीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील एका विद्यापीठाने आचारसंहितेच्या काळात मुलाखती … Read more

पुणे | 125 महाविद्यालयांना टाळे?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर, नाशिक व पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालये संलग्नता शुल्‍क न भरल्‍याच्‍या कारणावरुन अडचणीत सापडणार आहे. वारंवार सूचना देऊन महाविद्यालये विद्यापीठ संलग्नता शुल्‍क व अन्य शैक्षणिक बाबींची पूर्तता करण्यास दुर्लक्ष करीत असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर अशी जवळपास १२५ महाविद्यालये शैक्षणिक वर्षापूर्वी बंद करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात … Read more

पुणे | दिव्यांगांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग कल्याणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे सेंटर एसएसपीयूच्या मदतीने व राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी राज्य दिव्यांग कल्याण विभाग निधी उपलब्ध करून देईल, असेही ते म्‍हणाले. दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा दिव्यांग … Read more

पुणे | विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थापासून दूरच राहा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी व्यापक प्रमाणावर प्रबोधन घडवणारे समुपदेशनाचे कार्यक्रमही प्राध्यान्याने राबवले जाणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये आणि परिसंस्थांध्ये असे समुपदेशन करण्याच्या सूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. संस्थेच्या परिसरात अंमली पदार्थविषयक सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या … Read more

पुणे | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे विद्यापीठात ग्रंथदिंडी, काव्य संमेलन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ग्रंथदिंडीचे उद्धाटन प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, गुणवत्ता सुधार केंद्राचे संचालक प्रा. संजय ढोले, पाली विभाग प्रमुख प्रा. महेश देवकर, … Read more