पुणे विद्यापीठात प्रशिक्षण, संशोधनासाठी ऍकॅडमी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे “एसपीपीयू-यूओएम ऍकॅडमी फॉर ट्रेनिंग ऍन्ड रिसर्च’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सहमती पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या ऍकॅडमीमुळे विद्यार्थी व शिक्षकांना एकमेकांच्या विद्यापीठात प्रशिक्षण-अध्यापन करता येणार आहे. याचबरोबर, संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून संशोधन … Read more

पुणे विद्यापीठाच्या भोजनालयातील आंदोलनावर प्रशासनाची कारवाई

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्‍टरी’ (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद केली होती. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी काल रिफेक्‍टरी समोर आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. रिफेटक्‍रीचे नवीन नियम … Read more

पुणे – सिनेटची बैठक तातडीने बोलवावी

सदस्यांची विद्यापीठाकडे मागणी पुणे – लोकसभा निवडणुकामुळे आचारसंहितेचे कारण देऊन अधिसभा अर्थात सिनेटची बैठक पुढे ढकलण्याचा अधिकार उच्च शिक्षण विभागाला नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक हित लक्षात घेऊन अधिसभेची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर व प्रसेनजीत फडणवीस यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे. राज्यातील … Read more

ब्रेल लिपीतील पुस्तके 10 दिवसांत उपलब्ध करा : यूजीसी

पुणे – सर्व महाविद्यालये व संलग्न संस्थांनी त्यांच्या ग्रंथालयामध्ये तत्काळ ब्रेल लिपीतील पुस्तके, मासिके व इतर साहित्य येत्या दहा दिवसांत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व संलग्न संस्थांना याबाबतची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांमध्ये शेकडो … Read more

पुणे – सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘रिफेक्‍टरी’चे जेवण बंद; विद्यार्थी आक्रमक

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “रिफेक्‍टरी’ (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांनाच जेवणाची सुविधा आजपासून बंद केली. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आज रिफेक्‍टरीसमोर आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला. रिफेटक्‍रीचे नवीन नियम विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणार आहेत. हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान, सोमवारी दुपारी बारा वाजता रिफेक्‍टरीच्या समोर 100 हून अधिक विद्यार्थी होते. … Read more

पुणे – आता निकालावेळीच मिळणार ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र

“अर्ज करा, पुन्हा या’ची कटकट थांबणार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय – व्यंकटेश भोळा पुणे – परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यापासून ते अगदी नोकरीच्या मुलाखतीवेळी पदवी शिक्षणातील सर्व वर्षांचा निकाल एकत्रित सारांश असणाऱ्या “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच देण्यात येणार आहे. … Read more

पुणे विद्यापीठातील अतिरिक्‍त भत्ते आजपासून बंद!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्‍त दिले जाणारे अतिरिक्‍त भत्ते बंद आजपासून (दि.1) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बेसुमार दिल्या जाणाऱ्या अतिरिक्‍त भत्त्यांवर आता पायबंद बसणार असल्याची चिन्हे आहेत. पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्‍त दूरध्वनी भत्ता, वाहनभत्ता, सुपरवायझरी भत्ता, परीक्षा विभागात काम करण्याचा गोपनीय भत्ता आदी असंख्य … Read more