पुसेसावळीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करावी

पुसेसावळी – पुसेसावळी (ता. खटाव) येथील घटना निषेधार्ह आहे. राज्य सरकारने या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुसेसावळीस भेट दिली. येथे झालेल्या दंगलीतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आ. चव्हाण यांनी त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर या दंगलीतील जखमींची विचारपूस … Read more

सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; साताऱ्यात तणाव, खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद

सातारा : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात एका व्यक्तीने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.  यानंतर एका गटाने विशिष्ठ समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक करत प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस … Read more

दरे येथे उपस्थितांनी अनुभवली अनोखी मैत्री

पुसेसावळी – मैत्री हा शब्द आठवताच प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते ती कृष्ण- सुदामा यांची मैत्री. महाभारताच्या काळातली ही मैत्री. पण ती आजही अजरामर होऊन सर्व देशवासियांच्या मनात रुजली आहे. तशीच मैत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खटाव तालुक्‍यातील गोरेगाव वांगी या छोट्याश्‍या खेडेगावातील लक्ष्मण शिंदे यांची आहे. मैत्रीचे अनोखे नाते मुख्यमंत्र्यांच्या दरे गावच्या निवासस्थानी अनेकांना … Read more