वाटाघाटींसाठी इस्रायलचे शिष्टमंडळ जाणार इजिप्त, कतारला

नवी दिल्ली – हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी हमासच्या नेतृत्वाबरोबर वाटाघाटी करायला इस्रायलचे शिष्टमंडळ इजिप्त आणि कतारला जाणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी नुकतीच या शिष्टमंडळाच्या भेटीला अनुमती दिली आहे. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. नेतान्याहू यांनी मोसादचे संचालक आणि इस्रायलची सुरक्षा एजन्सी आयएसए यांच्या संचालकांशी चर्चा केली … Read more

अबुधाबीपासून कतारपर्यंत भारताचे वर्चस्व; मुत्सद्देगिरीचा भूगोल बदलत आहेत नरेंद्र मोदी

दोहा/अबुधाबी – आधी अबुधाबीमध्ये एका भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन आणि नंतर कतारचा दौरा; तर त्याआधी फाशीची शिक्षा ठोठावली गेलेल्या आठ भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणण्याचा चमत्कार… गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील भारतीय मुत्सद्देगिरीला पूर्णपणे नवी उंची दिली आहे. अरब जग भारताच्या आजच्याइतके जवळ कधीच नव्हते. पण मुत्सद्देगिरीचे जग इतके सोपे नसते. … Read more

#AsianCup2023 | अफिफची हॅटट्रिक, कतारने सलग दुसऱ्यांदा केला विजेतेपदावर कब्जा…

Asian Cup 2023 Final | शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अक्रम अफिफच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कतारने जॉर्डनचा 3-1 असा पराभव करत आशिया कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे अफिफने तिन्ही गोल पेनल्टीवर केले. त्याने 22व्या, 73व्या आणि 90+5व्या मिनिटाला गोल केले. त्याचवेळी, जॉर्डनसाठी एकमेव गोल याझान अब्दुल्ला अलनैमत याने 67व्या … Read more

अगोदर फाशी नंतर जन्मठेप आणि आता सुटका ; भारताच्या कूटनीतीने कतारलाही बदलावा लागला निर्णय..वाचा आजपर्यंत नेमकं काय घडलं ?

Qatar - india Realtion।

Qatar – india Realtion। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे. सुरवातीला फाशी नंतर जन्मठेप आणि आता सुटका असा या प्रकरणाचा प्रवास झाला. मात्र या जगामध्ये चर्चा होतीय ती म्हणजे भारताच्या कूटनीतीची… २६ ऑक्टोबर २०२३ रोजी … Read more

भारताच्या कूटनीतीचा जगात पुन्हा डंका ; कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ नौसैनिकांची सुटका ; ७ जण मायदेशी परतले

Qatar-India Relations।

Qatar-India Relations। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. त्यातील ७ जण मायदेशीदेखील परतले आहेत. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या नौसैनिकांच्या सुटकेसंबधी एक  निवेदन जारी केले आहे.  कतारविरुद्ध हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सर्व आठ माजी नौसैनिकांना मध्यपूर्वेतील या … Read more

सातारा – कातरखटावमधील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड हटवले

वडूज –  खेड्यापाड्यातून येऊन कातरखटावमधील चौकात आणि ग्रामपंचायत हद्दीत उठसूठ फ्लेक्स बोर्ड लावण्यावर ग्रामपंचायतीने प्रतिबंध घातले आहेत. गावात लावलेले फ्लेक्स बोर्ड ग्रामपंचायतीने हटवले. परवानगीशिवाय फ्लेक्स बोर्ड लावता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. कातरखटाव ग्रामपंचायत हद्दीत आणि चौकात फ्लेक्स बोर्डचे पेव दिवसेंदिवस वाढत चालले होते. कोणीही यावे आणि गावात फ्लेक्स बोर्ड लावावेत, अशी स्थिती … Read more

‘त्या’ 8 भारतीयांची फाशीची शिक्षा टळणार का? भारताचे अपील कतारने स्वीकारले

नवी दिल्ली  – कतारमधील एका न्यायालयाने कथित हेरगिरी प्रकरणात गेल्या महिन्यात आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताचे अपील स्वीकारले आहे. कतारी न्यायालय अपील तपासल्यानंतर सुनावणीची तारीख निश्‍चित करणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी पूर्णेंदू तिवारी, सुगुणाकर पाकला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंग गिल, बिरेंद्र कुमार … Read more

फाशीची शिक्षा सुनावलेल्या कतारमधील ‘त्या’ भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न ! एस. जयशंकर म्हणाले,भारत सरकार..”

नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या (Indian navy) आठ माजी कर्मचाऱ्यांना एका प्रकरणात कतारच्या (Qatar) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी दीर्घकाळापासून कतारच्या तुरुंगात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर (S jayshankar) यांनी सोमवारी सांगितले की, या आठही भारतीयांच्या सुटकेसाठी आणि त्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी भारत सरकार सर्व ते प्रयत्न … Read more

परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली कतारमध्ये फाशीची शिक्षा भोगत असलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांची भेट

S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आठ भारतीयांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास यावेळी जयशंकर यांनी कुटुंबियांना दिला. भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांवर कतारमध्ये हेरगिरीचा आरोप आहे. त्यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती आणि नुकतीच कतार न्यायालयाने त्याला … Read more

Qatar : कतारकडून ८ भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा ; शिक्षेची अमंलबजावणी सोपी नाही, भारत शिक्षेविरोधात सरसावला

Qatar :  कतारमधील  राहणाऱ्या आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून, त्यामुळे देशात चर्चेला उधाण आले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान आखाती देश कतारचा हा निर्णय भारतीयांसाठी धक्कादायक ठरला आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की एक छोटासा आखाती देश भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना फाशी देणार का?  पण असे करणे कतारला सोपे नसणार … Read more