अहमदनगर – नथनीचे कौतुक करणाऱ्यांनी नाक देणाऱ्यांची आठवण ठेवावी

अकोले – भंडारदारा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठीअकोलेकरांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. धरण आणि कालव्यांच्या कामासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा पुढाकार कोणीही नाकारू शकणार नाही. जलनायक कोणीही होत असले तरी “नथनीच कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्याला विसरू नये” असा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता आमदार थोरात यांना लगावला. … Read more

सातारा – छगन भुजबळ यांनी मुक्ताफळे उधळू नयेत

कराड – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे; परंतु छगन भुजबळ हे राईचा पर्वत करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून, आरक्षणावरून त्यांनी मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात शहाणपण दाखवू नये, असा टोलाही त्यांनी लागवला. मुंबईहून … Read more

आरक्षणाचा मुद्दा भावनिक बनवता येणार नाही : विखे

नगर – मराठा आरक्षणाचा मुद्दा समाजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला असून या मुद्‌द्‌याला भावनिक करून चालणार नाही. असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. सावेडी येथील महसुल भवन, या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री विखे यांच्या हस्ते आज (दि.14) करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. आरक्षणासाठी आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे निर्णय सरकार करतात ते निर्णय न्यायालय … Read more

निळवंडेबाबत काळजी करू नका : थोरात

संगमनेर – निळवंडे धरण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले असून, कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस कामे सुरू ठेवली होती. ऑक्‍टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते. परंतु सरकार बदलले आणि काम मंदावले. परंतु पाणी येणार आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी … Read more

“पाहुण्या’मुळे निळवंडेच्या पाण्याला उशीर..!

संगमनेर – निळवंडे कालव्याला मागच्या दिवाळी पाडव्यालाच पाणी येणार होते. आपण त्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण सध्या कोणी तरी पाहुणा येणार म्हणून निळवंडेच्या पाण्याला उशीर करू लागले आहेत, असा टोला आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांना नाव न घेता लगावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी … Read more

‘संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार’; राधाकृष्ण विखे यांची टीका

राहाता -उठसूठ रोज भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना कोणीही आता गांभिर्याने घेत नाही. स्वत:च्या पक्षासह आघाडीमध्ये ते एकटे पडले. वाईन उद्योगातील भागीदारी उघड झाली. आता पत्राचाळीतील आर्थिक गैरव्यवहारावरून निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईमुळेच त्यांची आगपाखड सुरू आहे. खोट बोल पण रेटून बोल स्वभावामुळेच त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आ. विखे … Read more

राज्यातील आत्ताची स्थिती काळजी वाढवणारी- विखे पाटील

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण राज्य स्तब्ध आहे. त्यात दररोज रुग्नांच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार विविध उपाय योजना करीत असले तरी राज्यातील आत्ताची स्थिती काळजी वाढवणारी असल्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र जास्त भरडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसरकारने सर्वपक्षीय … Read more

राजकारणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राजकरणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली असल्याचा खोचक टोला काँग्रेसवर लगावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील पत्रकार परिषेदत बोलताना मुनगंटीवार म्हटले … Read more