nagar | उपसरपंच पदावरून कोल्हार खुर्दमध्ये राजकारण तापले

कोल्हार, (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणूक गेल्या वर्षभरापूर्वी पार पडली. विखे विरुद्ध विखे अशा दोन गटांत अटीतटीची निवडणूक झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंचासह उपसरपंच पदाला गवसणी घालणाऱ्या गटात आता उपसरपंच पदाच्या वाटपावरून चांगलेच राजकारण तापले. विखे गटाचे विरोधक असणाऱ्या गटाला आता सत्तेत असलेले सदस्य अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असून विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा देऊन नवीन … Read more

nagar | बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक

राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी शहर व परिसरात काल रात्रीच्या दरम्यान बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक करीत असणाऱ्या सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तसेच पकडलेल्या आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, धर्मराज पाटील, हवालदार सूरज गायकवाड, वाल्मीक पारधी, अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, राहुल … Read more

nagar | कर्जदाराची आत्महत्या, प्रशासकावर गुन्हा दाखल करा

राहुरी,  (प्रतिनिधी):  प्रशासकाच्या जाचाला कंटाळून टाकळीमियाॅ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५ ) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.राजमाता जिजाऊ पतसंस्थेवर प्रशासक म्हणून असलेले किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी केली. सुभाष चोथे ९ एप्रिलला रात्री … Read more

nagar | राहुरी व्यापारी पतसंस्थेला १९ लाखांचा नफा

राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी तालुका व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये १८.७९ लाख निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली. पतसंस्थेने सुरुवातीपासूनच सभासदांना 11 टक्के लाभांश दिला आहे. काटेकोर कर्जवाटप, वसुलीचे कडक धोरण अवलंबून संस्थेच्या प्रगतीचा वाढता आलेख ठेवलेला आहे. संस्थेकडे आज अखेर 14.35 कोटी ठेवी असून कर्ज वितरण … Read more

nagar | लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाने यात्रात्सवाची सांगता

राहुरी, (प्रतिनिधी)- देवळाली प्रवरा येथील सर्वधमियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्राेत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या “नाद करा आमचा कुठं’ या लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाचा शहरवासियांनी मनमुराद आनंद लुटला. समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित्त कीर्तन, कुस्त्यांचा हंगामा, फटाक्यांची आतिषबाजी, पालखी मिरवणूक निमित्त महाराष्ट्रातील नामांकित ब्राॅस … Read more

nagar | चोरी करणाऱ्या महिला पोलिसांच्या जाळ्यात

राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी पोलीस ठाणे हद्दीत बसमध्ये प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन महिलांना राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. दि. २ मार्च रोजी एक महिला तिच्या आईला सोडण्यासाठी कोल्हारवरून बीडकडे बसने जात असताना बसमध्ये अनोळखी तीन महिलांनी फिर्यादी महिलेस धक्काबुक्की केली. तिच्या पर्समध्ये … Read more

nagar | कोल्हार खुर्दमध्ये ५ व्या दिवशीच पाणी

कोल्हार, (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द- चिंचोलीच्या संयुक्त जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यामुळे कोल्हार खुर्द येथे भीषण पाणी टंचाईचे वृत्त दैनिक प्रभातमधून प्रसारित करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत १० दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याला विराम देत अवघ्या ५ व्या दिवशी ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले. राहुरी … Read more

nagar | दुचाकीची चक्कर एजंटाला पडली महागात

राहुरी,(प्रतिनिधी): मोटारसायकल खरेदी- विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा मोटारसायकल घेऊन पसार झाला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनिल डॅनियल शेंडगे (वय ५०) हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई … Read more

nagar | निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा

राहुरी, (प्रतिनिधी)- पाश्चात संस्कृतीमुळे तरुण वर्ग फास्ट फुडकडे आकर्षित होत आहे. फास्ट फुडमुळे आरोग्याची हानी होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या सकस आहाराची जोड दिलेली आहे. विद्यार्थिनींनी आहारामध्ये फळे, भाजीपाला, पौष्टिक तृणधान्ये, कॅलशिअम आणि लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे. आहाराबरोबर योगाही तेवढाच गरजेचा आहे. निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार … Read more

nagar | राहुरीत फटाके फोडून व पेढे वाटप जल्लोष

राहुरी, (प्रतिनिधी): अहमदनगर शहराच्या नामांतरणाच्या निर्णयाचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर, दत्तात्रय खेडेकर, ज्ञानेश्‍वर बाचकर, सचिन डफळ, राजेंद्र तागड, अ‍ॅड. … Read more