Pune: रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची एसटीला गर्दी

पुणे – मुंबईतील रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या. परिणामी ही सर्व गर्दी एसटीकडे वळल्यामुळे शनिवारी (दि. 1) सकाळपासून स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून आली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून 35 जादा बस सोडण्यात आल्या. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत बस कमी असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. … Read more

पुणे | रेल्वेचे दोन महिन्यांचे बुकिंग फूल्ल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाळी सुट्टयांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताय आणि तेही ट्रेनने जात असाल तर थांबा… अधी तिकिट उपलब्ध आहे का याची पाहणी करा. कारण, उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे पुढील दोन महिन्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये रेल्वेचा मोठी गर्दी असते. काही नागरिक शाळा व कार्यालयांच्या सुट्ट्या जुळून आल्यानंतरच नियोजन … Read more

Pune: हडपसरमध्ये रेल्वे मार्गाची कचराकुंडी

पुणे – हडपसर परिसरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या बाजूच्या लोकवस्तीतून रेल्वे रूळालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. काही बेजबाबदार नागरिकांच्या वागणुकीमुळे रेल्वे मार्ग अस्वच्छ होत असून यातून दुर्घटना घडत आहेत. रेल्वे मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसचे मार्गाच्या बाजूला अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली … Read more

पुणे | कोल्हापूरहून येणाऱ्या पुणे, मुंबई एक्स्प्रेस रद्द

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील तारगांव-मसूर-शिरवडे या मार्गावरील दुहेरीकरण आणि तांत्रिक काम सुरू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी पुढील दोन दिवस ब्लाॅक घेण्यात आला असून, दि. 22 रोजी कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि दि. 23 रोजी पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच दि. 22 फेब्रुवारीला कोल्हापूर-सातारा डेमूचा प्रवास कराड येथे संपेल. … Read more

पुणे जिल्हा | रेल्वे प्रवाशांना तीळगूळ वाटप करून प्रवासी दिन साजरा

भिगवण, (वार्ताहर)- प्रवासी दिन दरवर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने साजरा केला जातो. बारामती रेल्वे स्टेशन येथे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा (रेल्वे) वापर करणार्‍या प्रवाशांचे गुलाब पुष्प, तीळगूळ, पाणी बाटली देऊन स्वागत केले. चालक (लोको पायलट, को – पायलट), रेल्वे गार्ड यांचा शाल, श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. रेल्वे इंजिनची पूजा करून सर्व प्रवाशांना … Read more

हा भारत आहे, स्वित्झर्लंड नाही..! शुभ्र बर्फातून धावली भारतीय रेल्वे; जम्मू-काश्मीरचा ‘तो’ Video एकदा पहाच

Jammu and Kashmir : पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये आहे. काश्मीर हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असल्याचे म्हटले जाते. बर्फाच्या चादरीने झाकलेले हे शहर स्वतःमध्ये स्वर्गापेक्षा कमी नाही. जगभरातून लोक या सुंदर निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. आता या अप्रतिम लँडस्केपची झलक देण्यासाठी, भारतीय रेल्वेने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये … Read more

प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेचे सुपर अॅप; सर्व सुविधा लवकरच मिळणार एकाच ठिकाणी

पुणे – भारतीय रेल्वे सेवेच्या काही सुविधा वेगवेगळ्या मोबाइल अॅप्सद्वारे मिळतात. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळे अॅप्स हाताळावे लागतात. शिवाय, या अॅप्सच्या व्यवस्थापनासाठी रेल्वेचे मनुष्यबळ खर्ची पडते. हे सर्व टाळण्यासाठी प्रशासन आता एकच सुपर अॅप तयार करत आहे. याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी माहिती दिली. हे सुपर अॅप तयार केल्यामुळे कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे … Read more

“मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

मुंबई : मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे हेदेखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात रेल्वेने 1 लाख … Read more

छ. संभाजीनगरपर्यंत नवा लोहमार्ग आणखी दुरावला

पुणे – पुणे-नगर ते छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वे मार्गाने जोडण्याच्या चर्चा मधल्या काळात सुरू होत्या. पण, या लोहमार्ग निर्मितीला पुन्हा ब्रेक लागला आहे. नगर शहराजवळ असलेल्या डोंगरामुळे हा मार्ग अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे मार्गाचे दुबार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगर ते छत्रपती संभाजीनगर या नव्या लोहमार्गासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसे … Read more

पुणे-दौंड रेल्वे मार्ग ‘उपनगरीय’ करा; पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी

पुणे – पुणे-दौंड मार्गाचा उपनगरीय रेल्वे मार्गात समावेश करावा, अशी मागणी पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने केली आहे. याबाबत रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला निवेदन पाठवण्यात आले आहे. पुणे-दौंड मार्गावर इलक्‍ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) दोन रेक दिले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण, ही कार्यवाही अजनूही झालेली नाही. या मार्गावर सध्या “डेमू’ धावते. … Read more