रैना आयपीएलमध्ये खेळण्याच्या तयारीत

मुंबई – मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज सुरेश रैना याने करोनाच्या भीतीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा निरोप घेत स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, आता त्याने सराव सुरू केल्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी चेन्नई संघात पुनरागमन करत अमिरातीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वी त्याला बीसीसीआय परवानगी देणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  ही … Read more

पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकावर रैना भावनिक

आयुष्याचे सार्थक झाले, अशा शब्दांत रैनाने मानले मोदींचे आभार नवी दिल्ली – ऐन तारुण्यात स्वतःला निवृत्त म्हणू नकोस. देशासाठी खेळताना दिलेले योगदान आजही आम्ही विसरलेलो नाही. तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, असा संदेश नुकतीच निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैना याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवला. त्यावर तुमची शाबासकी मिळाली आता अजून काय हवे, धन्य झालो, अशा शब्दांत … Read more

सचिनमुळेच विश्‍वकरंडक जिंकला – रैना

नवी दिल्ली – कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सिक्‍सरकिंग युवराज सिंग, गौतम गंभीर असे नावाजलेले खेळाडू संघात होते मात्र, तरीही 2011 साली झालेली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळेच जिंकण्यात यश आले, असे भारताचा अव्वल क्रिकेटपटू सुरेश रैना याने म्हटले आहे. भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जात असलेल्या मुंबईतील एतिहासिक वानखेडे मैदानावर 9 वर्षांपूर्वी 2 एप्रिल … Read more

इरफान व रैनाने ऑस्ट्रेलियन फलंदाजाबाबतचे उघड केले गुपित

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हरभजनला घाबरायचे मुंबई – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे जागतिक क्रिकेटवरचे वर्चस्व मोडीत काढले. 1990 च्या दशकाच्या अखेरपासून भारतीय संघाने सातत्याने ऑस्ट्रेलियाला नमविले आहे. भारतीय संघातील अव्वल गोलंदाज हरभजन सिंग याच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे बलाढ्य फलंदाज अत्यंत घाबरुन बाद व्हायचे, असे गुपित क्रिकेटपटू इरफान पठाण व सुरेश रैना यांच्या सोशल चॅटमधील चर्चेद्वारे उघड झाले आहे. मुळातच … Read more

परदेशी लीगबाबतचा दृष्टिकोन कायम; बीसीसीआयने दिले रैनाला उत्तर

मुंबई – भारताच्या ज्या खेळाडूंना आयपीएलसारख्या परदेशात होत असलेल्या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सुरेश रैना व इरफान पठाण यांनी भारतीय क्रिकेट नियामक मडळाकडे (बीसीसीआय) केली होती. या मागणीवर मंडळाने मत व्यक्त केले आहे. खेळाडूंना निवृत्तीनंतर अशा स्पर्धा खेळायच्या असतील तर आमची हरकत नाही. मात्र, ज्या खेळाडूंना भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी आहे त्यांचे … Read more