पुणे जिल्हा : पूर्व मोसमी पाऊस बरसला

दौंड तालुक्यातील शेतकरी समाधानी मलठण – दौंड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत उकाड्याने असह्य होत असेल तरी नंतर दमदार पावसाने वातवणात गारवा निर्माण केला आहे. दौंड तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नैऋत्य मान्सून अद्याप दाखल जरी झाला नसला तरी वळीवाच्या पावसाने तालुक्याच्या … Read more

आला रे पाऊस आला….! केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार, जाणून घ्या कुठल्या राज्यात कधी होणार पाऊसाची ‘एंट्री’

Monsoon News । देशभरात कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. आज गुरुवारी ३० मेला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मान्सून आता ईशान्य भारतातील बहुतांश भागात पुढे सरकू लागला आहे. रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात आधीच पाऊस झाला आहे, जो मान्सूनच्या … Read more

पिंपरी | शिलाटणे येथे वादळामुळे घरांचे पत्रे उडाले

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाचे आगमन होत असून या पावसामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. मंगळवारी (दि. १४) दुपारी झालेल्या वादळामुळे शिलाटणे गावातील अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच कार्ला गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने अक्षय पवार यांंच्या चारचाकी वाहनावर फांदी पडल्याने नुकसान झाले आहे. शिलाटणे … Read more

नगर | अतिवृष्टीचे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर

शिर्डी, प्रतिनिधी – जिल्‍ह्यात २०२२ ते २०२३ या कालावधीत झालेली अतिवृष्‍टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्‍या शेती पिकांच्‍या नुकसानीपोटी ६ लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मदतरुपी अनुदान मंजूर झाले. मंजूर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. जिल्‍ह्यामध्‍ये … Read more

कास, ठोसेघर परिसरात पर्यटकांची गर्दी; पावसाची हजेरी

ठोसेघर – जवळपास गेला महिनाभर दडी मारलेल्या वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून केलेले दमदार पुनरागमन आणि सलग सुट्ट्यांमुळे कास पठार आणि ठोसेघर धबधबा ही निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. त्यामुळे कास रस्त्यावर रविवारी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सातारा शहराच्या पश्‍चिमकडील निसर्गसंपदेने नटलेला भाग गेल्या काही वर्षांपासून देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. जागतिक वारसास्थळ … Read more

बळीराजा सुखावला..! राज्यातील विविध भागांत गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस; पुणे आणि नागपूर….

मुंबई – गेल्या महिन्यापासून चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा उत्तरा नक्षत्रातील पावसाने (rain) अखेर सुखावला आहे. मागील 24 तासांत राज्यातील (maharashtra) अनेक भागात मुसळधार पाऊस (rain) झाला आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार झाला आहे. खरीप हुकला पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी … Read more

ओडिशात पावसाचा हाहाकार; वीज पडून 10 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – ओडिशातील सहा जिल्ह्यांमध्ये वीज पडून 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला. या जिल्ह्यांमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला. विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले की, वीज पडल्याने खुर्दा जिल्ह्यात चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौध, जगतसिंगपूर आणि ढेंकनाल येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. वीज पडल्याने खुर्द येथेही तीन जण जखमी झाले आहेत. भुवनेश्वर आणि … Read more

संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट जारी !

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून मुंबई ठाण्यासह कोकणात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी पुढील काही दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात दि. 7 ते दि. 9 जुलै दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे येत्या 6 … Read more

पाऊस रुसला तर उसाची दुबार लागवड ; शेतकऱ्यांकडून रोपांच्या लागवडीला प्राधान्य

नीरा – साखर कारखान्यासाठी 1/7 ची लागवड म्हणजेच 1 जुलैला केलेल्या ऊस लागवडीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे रविवारी (दि. 1)च्या मुहूर्तावर पुरंदर तालुक्‍यातील ऊस भागात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी उसाचे बेणे आपल्या शेतात अंथरले आहे. आता प्रतीक्षा आहे ती शेतात पाणी येण्याची. दरम्यान, पुढील 10 दिवसांत पाऊस झाला नाही तर … Read more

नाशिकला मान्सून पूर्व पावसाचा तडाखा; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

नाशिक  – नाशिक शहरासह जिल्ह्यातील वातावरण निरभ्र होते. मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आजचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. अशातच सायंकाळी जिल्ह्यातील काही भागातील वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. लासलगाव परिसरात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी लावली असून असह्य उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे दिसून आले. नाशिक शहराचा जिल्ह्यात कालपासून उन्हाची तीव्रता वाढलेली … Read more