सातारा – राजापूरच्या अमेय फडतरेची इस्रोच्या सहलीसाठी निवड

पुसेगाव – जिल्हा परिषदेमार्फत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) अभ्यास सहलीसाठी जिल्हा परिषद शाळांतील निवडक प्रतिभावान व गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा शिष्यवृत्ती उत्तीर्ण सर्वसाधारण गटातील 41 विद्यार्थी यासाठी पात्र ठरले असून यामध्ये खटाव तालुक्यातून एकमेव राजापूर जिल्हा परिषद केंद्रशाळेचा सहावीतील अमेय विकास फडतरे पात्र ठरला आहे. हा अभ्यास दौरा 14 फेब्रुवारी रोजी … Read more

पुणे जिल्हा : गुलछडीमुळे बोबडे कुटुंबीयात सुगंध ; राजापूरात दीड लाखांचे उत्पन्न

दीपक येडवे वीसगाव खो – राजापूर (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. आजअखेर दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एक लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या, फुलदांड्यांचा फुलदाणी, पुष्पसजावट, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी होत … Read more

‘पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावरील हल्ला हा…’ आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

Journalist Shashikant Warishe murder

रत्नागिरी ( Journalist Shashikant Warishe murder ) – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित होता, अशी कबुली आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने दिली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे हे पाहण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या आरोपी आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात शशिकांत वारिशे या पत्रकाराचा अपघात … Read more

निलंबनाच्या कारवाईचा तणाव; एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन

राजापूर – राज्यात एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अजूनही मान्य झाली नाही त्यामुळे जवळपास गेल्या 50 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. या दरम्यान कामावर रूजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला … Read more

रत्नागिरी ; कोरोना योद्ध्यांवर जमावाकडून हल्ला

रत्नागिरी : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कोरोना योद्धा देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे घडली आहे. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास … Read more