पुणे जिल्हा | राजगड तालुक्यातही गाव खेड्यांमध्ये वाजली तुतारी

राजगड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात भल्या भल्यांना आश्चर्यचकित करून अनपेक्षितपणे सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळविला. त्यांना एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच विधानसभा मतदार संघात निर्णायक आघाडी मिळाली. लोकसभा मतदार संघातील सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या राजगड तालुकाही यात मागे राहिला नाही. तालुक्यात सुप्रिया सुळे यांनी सात … Read more

पुणे जिल्हा | पाबेत वादळी पावसाचा धुडगूस

राजगड, (वार्ताहर) – पाबे (ता. राजगड) येथे वादळी वार्‍यासह बुधवारी (दि. 22) अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने गावातील अंगणवाडीचे छत उडाले असून इमारतीचे कॉलम देखील जमीनदोस्त झाले आहेत. तसेच शाळेचे स्वच्छतागृह, टाकी व छतावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याचा वेग इतका प्रचंड होता की वर्गखोलीवरील पूर्ण छत अँगलसह जवळच असलेल्या 50 फूट उंच … Read more

पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात खरीप पूर्व शेतीच्या कामांना सुरुवात

  वेल्हे, (प्रतिनिधी) – इंद्रायणी तांदुळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या राजगड तालुक्यामध्ये. खरीप पूर्व हंगामी शेती माशागत कामांना गती आली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपारिक शेती मशागतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत असल्याचे संपूर्ण राजगड तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभर दिवसा उन तर सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे … Read more

पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात लोकसभा निकालावर लागतायत पैजा..

राजगड, (प्रतिनिधी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा वाढेल, असे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मात्र मतदारांमध्ये निरुत्साहच पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीत सापडली नाहीत. तर अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. यास राजगड तालुकाही अपवाद नसून तालुक्यात सायंकाळी ६ पर्यंत एकूण ५२ हजार मतदानापैकी ३२ हजार ८५५ मतदान झाले. … Read more

पुणे जिल्हा | अर्ध्या गुंठ्यातील मोगऱ्याचे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न

राजगड (प्रतिनिधी) – तालुक्यातील वेल्हे येथील शेतकरी शिवाजी देवगिरकर व पत्नी जयश्री यांनी अर्धा गुंठे क्षेत्रावर पंचवीस मोगरा वेलांची लागवड करून त्यातून सुरुवातीच्या हंगामात आतापर्यंत ४० दिवसांमध्ये ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजून फुले व कळी तोड चालू आहे. हा हंगाम तीन महिने चालतो. अजून महिनाभर अशीच तोड चालू राहिली तर उत्पन्नात दुपटीने वाढ … Read more

पुणे जिल्हा | सोशल मिडियावर एकच हुंकार रोजगार…

कापूरहोळ, (वार्ताहर) – भोर आणि राजगड तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने तालुक्यातील तरुणाला रोजगार शोधण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. पुणे, मुंबई व शिरवळ या ठिकाणी रोजगार मिळाला तरी येणे-जाणे, घरभाडे यातच पगार संपून जातो. मिळालेला रोजगार कायमस्वरूपी नसतो गरज संपल्यानंतर कंपनी तरुणाला घरी बसविते आणि तरुणाला पुन्हा नोकरीच्या शोधात भटकंती करावी लागते. नोकरीसाठी किती दिवस … Read more

पुणे जिल्हा | वेल्हे येथे दहा गुंठे जागेत मिर्ची लागवडीतून हजारो रुपयांचे उत्पन्न

राजगड, (प्रतिनिधी) – तालुक्यातील वेल्हे येथील शेतकरी शिवाजी देवगिरकर यांनी दहा गुंठे क्षेत्रावर पाचशे रोपे मिरची लागवड करून त्यामध्ये एक एक बेड कलिंगड, कारली, वांगी, दोडका, टोमॅटो आणि एक बेड काकडी अशी संमिश्र भाजी पिके घेतली आहेत. यातून त्यांना दररोज हक्काचे उत्पन्न चालू झाले आहे. सध्या त्यांचा मिरचीचा तोडा चालू झाला असून महिन्याला साधारण वीस … Read more

पुणे जिल्हा | नामकरण नंतर तरी तालुका राजगडचा विकास होणार का..?

वेल्हे, (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे झाल्याने शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. हे सर्व होत असताना, राजगडकरांना मात्र नामकरणानंतर तरी दुर्गम व विकासापासून वंचित असलेल्या वेल्हे तालुक्याची ओळख विकसित राजगड तालुका अशी होणार का..? या ठिकाणी दर्जेदार कामे व ऐतिहासिक पर्यटन तालुका म्हणून घोषित होणार का, असा प्रश्न पडला आहे. अनेक गावांमध्ये … Read more

राजगड तुमच्या बापाचा आहे का? पुरातत्त्व विभागाच्या ‘त्या’ निर्णयानंतर शिवप्रेमींमध्ये उसळली संतापाची लाट

पुणे – स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या राज्य संरक्षित स्मारक किल्ले राजगड परिसरात रात्रीच्या वेळी मुक्काम करण्यास बंदी घालण्याचा आदेश पुण्याचे पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वाहणे यांनी काढला. या संदर्भातली प्रत पुरातत्व विभाग संचालक मुंबई, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी वेल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वेल्हे, ग्रामपंचायत गुंजवणे, ग्रामपंचायत पाल बुद्रुक वेल्हे यांना पाठवली आहे. राजगडावरील पराक्रमाची … Read more