पुणे जिल्हा | धानोरे शाळेतील मुलांनी बनविली राजमुद्रा प्रतिकृती, जिरेटोप

आळंदी,(वार्ताहर)- जि. प. प्राथमिक आदर्श शाळा धानोरे येथील 4थीच्या विद्यार्थ्यांना रयतेच्या सुखासाठी अविरत लढणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रमाची गाथा समाजातील प्रत्येकाच्या हृदयातून पेटून उठावी. तसेच बालमनावर त्यांची शौर्यगाथा उमटावी या हेतूने शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिकृती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्याचबरोबर राजमुद्रेवरील मजकूर मुलांकडून पाठांतर करून घेवून त्याचा अर्थ सांगण्यात आला. याच उपक्रमातून … Read more

काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्यांपासून बनणार राजमुद्रा

पोलीस महासंचालक कार्यालयाची सूचना : रिकाम्या पुंगळ्यांसह द्यावा लागतो हिशेब – तुषार रंधवे पिंपरी – पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सरावानंतर शिल्लक राहणाऱ्या काडतुसांच्या उरलेल्या रिकाम्या पितळी पुंगळ्यांचा वापर पोलीसांच्या कार्यालयीन वस्तु तयार करण्यासाठी केला जाणार आहे. यामध्ये कार्यालयीन नामफलक, राजमुद्रा अशा विविध वस्तुंचा समावेश आहे. याकामाकरिता पाच वर्षांच्या कालावधीकरिता हरियाणा येथील एका खासगी ठेकेदाराची नियुक्‍ती … Read more

राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने एक हजार जणांना अन्नवाटप

पुणे – करोना विषाणूमुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व उत्सव, सण, जत्रा रद्द केल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार जणांना अन्नवाटप केले. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या कार्याची दखल घेतली असून कौतुक केले आहे. करोना व्हायरसच्या … Read more

मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या बदललेल्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला आहे. राजमुद्रेला राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप घेत मनसेला नोटीस बजावली आहे. आयोगाच्या नोटीसला मनसे कोणते उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी महाअधिवेशनात पक्षाचा जुना झेंडा बदलला. नव्या भगव्या झेंड्यात त्यांनी शिवमुद्रेचा … Read more

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बोगस

हा तर शिवप्रेमींना अवमान : इंद्रजित सावंत कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली शिवमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हे अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, असा इशारा प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या … Read more

मनसेच्या नव्या झेंड्याची मराठा संघटनांनी केली मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रार

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन पार पडत असून यावेळी नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. नवीन झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, यावर काही मराठा संघटनांनी राजमुद्रेच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. मराठा संघटनेचे विनोद पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या … Read more