संगमनेर शहरात हिंदू समाजाचा विराट मोर्चा

संगमनेर – हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला संगमनेरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता भगव्या मोर्चाला सुरुवात झाली. दिल्लीतील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण, देशभरात घडत असलेल्या लव्ह जिहादचे वाढते प्रमाण आणि जोर्वे रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी दोन गटांत झालेला वाद याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. जवळपास 25 हजारपेक्षा जास्त हिंदू बांधव रस्त्यावर उतरून या मोर्चात … Read more

मुख्यमंत्री पदामागे छुपा गेम; प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला टोला

नगर – महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्या नावाने मुख्य मंत्रिपदाच्या दावेदारीची चर्चा सुरू असली, तरी यामागे काहीतरी छुपा गेम दिसतो, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसू लागले आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे लगावला. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मागील महिन्यात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे … Read more

उर्वरित आरोपींवर कडक कारवाई करा; पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या सूचना

शेवगाव -छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 14) रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या, तसेच, वाहने व दुकानाच्या तोडफोडीच्या प्रकरणातील राहिलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, तसेच ही बाब पोलिस यंत्रणेने गांभीर्याने घ्यावी, अशा सूचना नाशिक परिक्षेत्रचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी येथे दिल्या. शेवगावात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस महानिरीक्षक … Read more

जेऊर यात्रेतील दगडफेकप्रकरणी 14 आरोपींना अटक

नगर – नगर तालुक्‍यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवार दि. 7) झालेल्या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. जेऊरच्या यात्रोत्सवात दोन गटात झालेल्या दगडफेकीत यात्रेतील दुकानदार महिला, लहान मुले व काही ग्रामस्थ असे सुमारे दहा ते बारा … Read more

डॉ. आंबेडकर जयंती; नगरमधून 248 हद्दपार

नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून काही गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये नगर शहरातील भिंगार, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील 248 जणांना समावेश आहे. याशिवाय सीआरपीसी 107, 110 नुसार 32 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येवू नये … Read more