nagar | पॅलेस्टाईनच्या झेंडा फडकविण्याची घटना गंभीर : पालकमंत्री विखे

नगर (प्रतिनिधी) – रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री ‍विखे पाटील यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्ह्यात रमजान ईदचा … Read more

nagar | हिंदू -मुस्लिम बंधुभाव कायम टिकून

संगमनेर, (प्रतिनिधी) – संगमनेर हा भाईचाऱ्याचा नारा देणारा तालुका आहे . हिंदु-मुस्लिमसह सर्वधर्मीय लोक येथे एकत्रित राहत असल्यानेच तालुक्याची प्रगती झाली असून, माजी महसूलमंत्री व तालुक्याचे भाग्यविधाते आ.बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात हिंदू -मुस्लिम बंधुभाव कायम टिकून ठेवला असल्याची भावना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी व्यक्त केली. रमजान ईद निमित्ताने धांदरफळ बु … Read more

पुणे | पोलीस यंत्रणा सज्ज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी लोकसभा निवडणूक व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्मांचे धार्मिक सणांच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सदर रूट मार्चआधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हा … Read more

Pune: रमजान ईदसाठी शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पुणे – रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर गोळीबार मैदानाकडे जाणार्‍या वाहतुकीत बदल केला जाणार आहे. शनिवार २२ अथवा रविवार २३ एप्रिलला शहरात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. या दिवशी मुस्लीम बांधव एकत्र येऊन आपल्या भागातील मशिद व ईदगाह मैदानावर तसेच सार्वजनिक ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी … Read more

पुणे : उत्साह अन्‌ शिरखुर्म्याचा गोडवा…

पुणे- करोना आणि लॉकडाऊननंतर यंदा पहिल्यांदाचे मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान येथे ईद-ऊल-फित्र अर्थात रमजान ईदनिमित्त सामूदायिक नमाज अदा केली. यावेळी अल्लाहकडे विश्‍वशांतीची दुवॉं मागण्यात आली. ईदच्या निमित्त सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज अदा करण्यात येते. यंदाही शेकडो समाजबांधव मंगळवारी ईदनिमित्त एकत्र आले होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, ईदगाह ट्रस्टी, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, लष्कर … Read more

Eid 2022 | मुख्यमंत्री ठाकरेंकडून ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्त शुभेच्छा

मुंबई :- मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Eid 2022 | ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना,दानधर्म तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो. ईद उल फित्र (रमजान ईद) सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बंधु -भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या … Read more

‘रमजान ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘रमजान ईद’ निमित्त शुभेच्छा

मुंबई : पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता अर्थात ईद-उल-फित्र (रमजान ईद) च्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा असा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. नियमांचे काटेकोर पालन करून, सर्वांना आरोग्य … Read more

‘रमजान ईद’ निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना केली आहे. रमजान ईद आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्वबंधूत्वाची, सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातील गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावे. … Read more