नेवासा: “रेशनकार्ड’साठी 10 हजार रुपये घेतात…; नागरिकांच्या तक्रारीनंतर खासदार लोखंडेंनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

नेवासा – तहसिलदार संजय बिरादार यांच्या दुर्लक्षामुळे पुरवठा शाखेतून नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना रेशनकार्ड शिल्लक नसल्याचे सांगून दलालांमार्फत दहा हजार रुपये घेतल्यानंतर झटपट रेशनकार्ड दिले जात असल्याच्या तक्रारी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी केल्यामुळे तहसिलदारांची बोलती बंद झाली. तहसिलदार आपल्या कार्यालयात लक्ष न देता केवळ उडवाउडवीचे उत्तरे देत कामात चालढकलपणा करत असल्यामुळे तहसिलदारांची … Read more

पिंपरी | नागरिक सुविधा केंद्र चालकांचा मनमानी कारभार

वडगाव मावळ, (वार्ताहर) – शासनाने नागरिकांना रेशन कार्ड मिळविण्यासाठी किंवा त्यातील दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनाने रेशन कार्ड बाबतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. पण सदरची प्रक्रिया अवघड व किचकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे जमत नाही. याचा गैरफायदा नागरिक सुविधा केंद्र चालक घेत … Read more

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; आता संपूर्ण भारतात कोठूनही घ्या धान्य, सर्व राज्यांत ONORC योजना सुरु

One Nation One Ration Card: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. आता संपूर्ण देश या योजनेच्या कक्षेत आल्याचा दावा अर्थ मंत्रालयाने शनिवारी केला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड वैध असेल. अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, आता 80 कोटी NFSA वापरकर्ते … Read more

सव्वातीन लाख कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’; दिवाळीनिमित्त जिल्ह्यात वाटप सुरू

पुणे – राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, परिमंडळ अधिकारी दिनेश … Read more

कामाची बातमी! ‘रेशनकार्ड’शी संबंधित कामे करण्यासाठी आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही; ऑनलाइन होणार ‘ही’ कामे

पुणे  – राज्य शासनाने रेशनकार्ड (ration card ) काढण्यासाठी तसेच नावात बदल करणे, नविन नाव समाविष्ट करणे आदींसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन सुविधेमुळे रेशनकार्डसाठी ऑनलाइन (online ration card )अर्ज करता येतो. तसेच रेशनकार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे रेशनकार्ड काढण्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाही. शिधापत्रिकेसाठी … Read more

PUNE: जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी वाढणार; अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत वाढीव शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य

पुणे – राज्य शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 57 हजार शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय योजनेचा तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 37 लाख 78 हजार 784 नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून … Read more

शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा; शहरासह ग्रामीण भागातील 8 लाख 84 हजार जणांचा समावेश

पुणे – राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त 100 रुपयांमध्ये चार जिन्नसांचा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अशा एकूण 8 लाख 84 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. 1 सप्टेंबर) आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. शिंदे-फडणवीस … Read more

आता…ऑनलाइन ई-रेशनकार्ड; शहरातील नऊ हजार नागरिकांना उपलब्ध

पुणे – राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि राज्य शासनाच्या योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन ई रेशनकार्ड सुविधेकरीता सेवा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोफत शिधापत्रिका मिळत असून ई रेशनकार्ड डाऊनलोड सुद्धा करून घेता येत आहे. मागील चार महिन्यात पुणे शहरातील … Read more

आता ‘या’ राज्यातील नागरिकांना मिळणार फक्त 24 तासांत रेशन कार्ड

नवी दिल्ली – भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्ही दुसऱ्या राज्यात अथवा शहरात राहण्यासाठी गेला असेल तर, तुम्हाला शिधापत्रिकेत सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला मोफत रेशनचा लाभ मिळत राहील. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या … Read more

अबाऊट टर्न : नाव बदला!

“नावात काय आहे,’ असं शेक्‍सपीअरनेच काय… कुणीही म्हटलं असतं तरी नावात नेमकं काय असतं हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना काही दिवसांपूर्वीच कळून चुकलंय. विशेषतः एकमेकांच्या अडनावांवरून टिप्पणी करणाऱ्या नेत्यांना तर नाममाहात्म्य चांगलंच पटलं असेल..! नावाविषयी आणि त्याहूनही अधिक अडनावाविषयी प्रत्येकजण आत्यंतिक संवेदनशील पाहायला मिळतो. कारण अडनावाला चिकटूनच जात येते.  खरं तर जातिव्यवस्थेचा इतिहास जसजसा जुना होईल, तसतसं … Read more