गृहकर्जाच्या व्याजावर हवी संपूर्ण करमाफी; रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

नवी दिल्ली  – करोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात देशातील रिअल इस्टेट क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. मात्र, साथीच्या आजारातून सावरल्यानंतर या क्षेत्रात सुधारणा दिसू लागली. मात्र, या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांना अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. आता आगामी केंद्रिय अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला गृहकर्जाच्या व्याजावर संपूर्ण करमाफी हवी आहे, असे दिसते. सध्या, कलम 24 अंतर्गत, गृहकर्जाच्या … Read more

पुणे पालिकेची स्थावर मालमत्ता 55 हजार कोटींची

पुणे – महापालिकेच्या रिकाम्या जागा, बांधिव मिळकती तसेच इतर मालमत्तांचे रेडी रेकनरनुसार बाजारमूल्य तब्बल 55 हजार कोटींचे झाले आहे. पत निश्‍चितेसाठी या मिळकतींचे नुकतेच मूल्यांकन केले होते. त्यातून ही रक्कम समोर आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मिळकतींवर अतिक्रमणे होत असल्याने पालिकेने या मिळकतींचे “जीआयएस पॉलिगॉन मॅपिंग’ हाती घेतली आहे. आतापर्यंत 3,267 मिळकतींचे मॅपिंग झाले आहे. … Read more

एक रुपयाही स्थावर मालमत्ता नसलेले पंजाबच्या मंत्रीमंडळातील मंत्री लालचंद कोण आहेत ?

चंदीगड – पंजाबमध्ये आज भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार झाली आहे.  मान मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांनी आज शपथ घेतली. शुक्रवारी रात्रीच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यापैकी एक म्हणजे लालचंद कटारुचक यांना आज मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. 51 वर्षीय लाल चंद नुकत्यांच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भोआ … Read more

कामाची बातमी : 2022 मध्ये घरांच्या किमती ‘इतक्या’ टक्‍क्‍यांनी वाढणार

मुंबई – घरे तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळ या वर्षात घरांच्या किमती 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढू शकतात असे क्रेडाई या विकासकांच्या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. क्रेडाईने 30 डिसेंबर ते 11जानेवारी या कालावधीत देशभरातील 1,322 विकासकांना यासंदर्भात माहिती विचारून सर्वेक्षण केले. त्या माहिती या आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार … Read more

‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरांची मागणी वाढली; पुण्यातला रियल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेत आहे

पुणे : कोरोनामुळे अनेक महिने मंदीचा सामना केल्यानंतर पुण्यातला रियल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मंदावलेली बांधकामं पुन्हा जोमात सुरू होत आहेत. त्यामुळे संपूर्ण उद्योगात सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बांधकाम सुरु असलेल्या फ्लॅट्सची गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.3 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी ते जून 2021 दरम्यान पुण्यात … Read more

सनी लिओनी आणि “शहेनशहा’ राहणार एकाच अपार्टमेंटमध्ये?

मुंबई : व्यवसायाने मूलत: पोर्नस्टार असलेली आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेली मूळ भारतीय वंशाची कॅनेडियन सनी लिओनी आता एका दिग्गज अभिनेत्याचा रहिवास असलेल्या इमारतीत राहणार आहे. हा एक साधासुधा माणून नसून “महान’ असामी असून “शहेनशहा’ या नावानेही तो ओळखला जातो. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच गुंतवणूकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक … Read more

गुड न्यूज : जून-जुलैमध्ये घरांची विक्री वाढणार

या महिन्यात सुरू झालेल्या वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये घरांची विक्री २५-३०% वाढणे आणि सर्वात जास्त नवीन प्रकल्पांच्या शुभारंभाची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जाणकारांनुसार, घर-सदनिकेची विक्री व्यावसायिक आणि भाडेतत्त्वावरील मालमत्तेच्या तुलनेत जास्त वेगाने वाढेल. अनेक राज्यांत मुद्रांक शुल्क किंवा सर्कल रेट घटणे आणि गृह कर्ज स्वस्त होण्यासारख्या बाबी स्थावर मालमत्ता क्षेत्राला सपोर्ट करत आहेत. कॉन्फेडरेशन … Read more

गुड न्यूज : पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वाढच

पुणे – मागील वर्षीच्या कडक लॉकडाऊनच्या काळानंतर आता अर्थव्यवस्था धीम्या गतीने पूर्वपदावर येत आहे आणि जागतिक रेटिंग संस्था भारताच्या 2021 आणि 2022 मधील विकासाची गती वाढत आहे. अशा वेळी निवासी जागांसाठीची मागणी केंद्र सरकार, विविध राज्यांमधील सरकार, रिझर्व्ह बॅंक आणि पूर्ण बॅंकिंग क्षेत्र यांनी योजलेल्या विविध उपायांमुळे पुन्हा वाढीला लागली आहे. विविध क्षेत्रांत पुन्हा रोजगार … Read more

पुणे : कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करणारा “कुटुंब’ गृहप्रकल्प

पुणे – चहूबाजूने वाढत असलेल्या पुण्याच्या पश्‍चिम-दक्षिण क्षितीजावर आकाराला येत असलेला “कुटुंब’ हा महत्त्वाकांक्षी आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृहप्रकल्प आंबेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रांगण बिल्डकॉन आणि लक्ष्मी डेव्हलपर्सच्या या प्रकल्पात 250 हून अधिक कुटुंबांचं स्वत:चं घर साकारण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, तेही अगदी माफक किंमतीत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात “कुटुंब’ हा … Read more

रिअल इस्टेट क्षेत्रावरील प्रीमियममध्ये 50 टक्के कपात

मुंबई – रिअल इस्टेट क्षेत्रावरील प्रीमियम 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे रिऍल्टी क्षेत्र लवकर पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल असे विकासकांनी सांगितले. त्यामुळे आहे ते प्रकल्प लवकर पूर्ण होतील. नव्या प्रकल्पाचा पुर्ततेचा कालावधी कमी होईल. तसेच या क्षेत्रात नवे भांडवल येण्यास मदत होईल, असे … Read more