Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात … Read more

‘मला लाथाडायची भाषा करू लागले….’; छगन भुजबळांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचं खरं कारण

Chhagan Bhujbal – कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होते की मी ओबीसी एल्गार सभेला जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावे लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही, असे स्पष्टीकरण ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

विरोधी पक्षाच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नाला ममता बॅनर्जींचा ‘खो’; ‘या’ कारणामुळे ‘एकला चलो रे’चा दिला नारा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजप विरोधात सर्व पक्ष  एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, जदयू  असे अनेक पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधी निवडणूक लढवणार असल्याचे  सांगत आले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या या घोषणांना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठा झटका  … Read more

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ यापुढे ‘अमृत उद्यान’ नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातील आणखी एक महत्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव मोदी सरकारने बदलले आहे. आता यापुढे हे उद्यान ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखले जाणार आहे. राष्ट्रपती भवनात असलेले मुघल गार्डन हे त्यातल्या सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी लाखो … Read more

निमित्त : वादग्रस्त पद?

अलीकडच्या काळात राज्यपाल पदावर विराजमान झालेल्या व्यक्‍ती केंद्र सरकारचे हस्तक म्हणून उघडपणे वावरत असतात. यातील खाचाखोचा समजून घेण्यासाठी या वादग्रस्त पदाचा इतिहास समजून घ्यावा लागेल. केंद्र सरकार नेमत असलेले राज्यपाल या ना त्या प्रकारे केंद्रातील सत्तारूढ पक्षाला खूश ठेवत असतात. एक अपेक्षा होती की जर निवृत्त नोकरशहा सेनाधिकारी या पदांवर नेमले तर यातील राजकारण राज्यपाल … Read more

Health : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपावेसे का वाटते? आळस नव्हे, ‘हे’ आहे कारण !

ऑफिस असो, रेस्टॉरंट असो किंवा कुठलीही पार्टी, जर आपण थोडे जड अन्न खाल्ले तर आपले मन नक्कीच घरात आरामदायी पलंगाचा विचार करू लागते. आता नाश्ता असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, ते खाल्ल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना झोप येऊ लागते. हे विशेषतः दुपारच्या जेवणानंतर अधिक जाणवते.  ऑफिसमध्ये जेवल्यानंतर पुष्कळ लोक जांभई देताना दिसतात, इतकेच नाही तर … Read more

डिप्रेशनमुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेणार होती दीपिका, मुलाखतीदरम्यान सांगितली खळबळजनक कहाणी

  मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमधील टॉप हिरोईन पैकी एक आहे. त्यामुळे दीपिकाच्या ड्रेसिंगपासून ते तिच्या सोशल मीडियापर्यंतच्या सर्व गोष्टींची मीडियामध्ये जोरदार चर्चा असते. नुकतंच दीपिकाने एका इव्हेंटमध्ये आपण डिप्रेशनमध्ये गेल्याची धक्कादायक कबुली दिली.तसेच मेंटल हेल्थबाबत अस्वस्थ असताना आपल्या आईने कशाप्रकारे आपल्याला ओळखले हे देखील दीपिकाने सांगितले. करिअरच्या चांगल्या वळणावर असताना दीपिकाने आपण प्रचंड … Read more

‘या’ कारणामुळे एअर होस्टेस विमानात चहा-कॉफी पीत नाहीत!

नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान लोक चहा किंवा कॉफी नक्कीच पितात. लांबच्या प्रवासात चहा प्रेमींसाठी चहा एक आरामदायी पदार्थ म्हणून काम करतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विमानातील एअर होस्टेस आणि केबिन क्रू फ्लाइटमध्ये चहा-कॉफी पीत नाहीत. याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रसिद्ध टिकटॉकर आणि एअर होस्टेस सिएरा मिस्टने तिच्या कामाशी संबंधित … Read more

नियम सर्वांसाठी सारखाच! ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी निर्बंधांमुळे रद्द केले आपले लग्न

न्यूयॉर्क : करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा अर्थात ओमायक्रॉनचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. सर्वच देशांनी या व्हेरिएंटची धास्ती घेत आपापल्या देशातले निर्बंध कडक केले आहेत. न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे चक्क देशाच्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्नच रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंडमध्ये करोना पार्श्वभूमीवर नव्या निर्बंधांची घोषणा करतानाच न्यूझीलंडच्या … Read more

“या” कारणामुळे पंजाब निवडणूक पुढे ढकलली; आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पंजाब मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. तेथे आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या बदलाविषयी निवडणूक आयोगाने कॉंग्रेस, अकालदलासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांना विश्‍वासात घेऊनच हा बदल केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती आहे. या दिवशी उत्तरप्रदेशातील बरेच भाविक संत … Read more